सेंट लुसिया WI vs ENG 3rd T20I Live Streaming : वेस्ट इंडिज क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा T20 सामना 15 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना सेंट लुसिया येथील ग्रोस आयलेट येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
विंडीजसाठी करो या मरो सामना : दुसऱ्या T20 मध्ये इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. यासह पाहुण्या संघानं पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. आता मालिकेतील तिसरा सामना वेस्ट इंडिजसाठी करो किंवा मरो असा आहे. अशा स्थितीत वेस्ट इंडिज संघाला मालिकेत पुनरागमन करायला आवडेल. दुसरीकडे तिसरा T20 सामना जिंकून मालिका काबीज करण्यावर इंग्लंडचं लक्ष असेल. वेस्ट इंडिजची कमान रोव्हमन पॉवेलच्या खांद्यावर आहे. तर इंग्लंडचं नेतृत्व जोस बटलरकडे असेल. दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघ आतापर्यंत 32 वेळा T20 मध्ये वेळा खेळले आहेत. ज्यात वेस्ट इंडिजचा वरचष्मा दिसत आहे. वेस्ट इंडिजनं 32 पैकी 17 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडनं 15 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला. याशिवाय वेस्ट इंडिजनं घरच्या मैदानावर 17 पैकी 10 सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजचा संघ घरच्या मैदानावर अधिक मजबूत असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण आतापर्यंतच्या मालिकेत इंग्लंडनं चमकदार कामगिरी केली आहे.
खेळपट्टी कशी असेल : डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असेल. नव्या चेंडूमुळं वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय इथं फिरकीपटूंना फारसं वळण मिळण्याची शक्यता नाही. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप चांगली आहे हे सर्वांनाच माहीत आहे. नाणेफेक जिंकणारा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवरील T20 सामन्यांची आकडेवारी :
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 41 T20 सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 19 वेळा विजय मिळवला आहे, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं 22 वेळा विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाला इथं जिंकण्याची अधिक शक्यता असल्याचं यावरुन दिसून येतं.
- डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या : 147
- डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या : 130
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा T20 सामना कधी खेळला जाईल?