महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'फायनल'मध्ये स्थान पक्क करण्यासाठी आफ्रिकन संघ उतरणार मैदानात, श्रीलंका पलटवार करणार? निर्णायक सामना 'इथं' पाहा लाईव्ह - SA VS SL 2ND TEST LIVE IN INDIA

दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका क्रिकेट संघात दोन सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत यजमान संघ 1-0 नं आघाडीवर आहे.

SA vs SL 2nd Test Live in India
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 5, 2024, 9:35 AM IST

गकबेर्हा SA vs SL 2nd Test Live Streaming : दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज 5 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. उभय संघांमधला हा सामना गकबेर्हा येथील सेंट जॉर्ज पार्कवर होणार आहे.

पहिल्या कसोटीत यजमान संघाचा विजय : पहिल्या कसोटीत यजमान दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेचा 233 धावांनी पराभव केला. या सामन्यात श्रीलंकेला 516 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 79.4 षटकांत 282 धावांवर गारद झाला. यासह यजमान संघानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दक्षिण आफ्रिकेची नजर दुसरी कसोटी जिंकून मालिका काबीज करण्यावर असेल. दुसरीकडे, दुसरी कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्याचं श्रीलंकेचं लक्ष्य असेल. हा कसोटी सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका आतापर्यंत कसोटीत 32 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी आफ्रिकन संघानं 17 जिंकले आहेत. तर श्रीलंकेनं 9 सामने जिंकले आहेत. याशिवाय 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. यावरुन दक्षिण आफ्रिकेचा संघ अधिक मजबूत असल्याचे दिसून येतं. तर दक्षिण आफ्रिकेत दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 18 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात दक्षिण आफ्रिकेनं 18 पैकी 14 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेचा संघ केवळ तीन वेळा विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला आहे.

दोन्ही संघातील कसोटी विक्रम कसे : दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 13 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. ज्यात दक्षिण आफ्रिकेचा वरचष्मा दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेनं 13 पैकी 8 मालिका जिंकल्या आहेत. तर लंकेनं यांनी चार कसोटी मालिका जिंकल्या आहेत. याशिवाय एक कसोटी मालिका अनिर्णित राहिली.

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज :

श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेनं दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. जयवर्धनेनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 17 सामन्यांच्या 32 डावांमध्ये 57.48 च्या सरासरीनं 1782 धावा केल्या आहेत. यात महेला जयवर्धनेनं 6 शतकं आणि 2 अर्धशतकं झळकावली असून 374 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज :

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननं सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. मुथय्या मुरलीधरननं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 15 सामन्यांच्या 27 डावांमध्ये 22.22 च्या सरासरीनं आणि 2.34 च्या इकॉनॉमीनं 104 बळी घेतले आहेत.

खेळपट्टीचा अहवाल कसा : गकबेर्हा येथील मैदानाच्या चौरस सीमा 64 मीटर आणि 67 मीटर आहेत, तर सरळ सीमा 77 मीटर लांब आहे. दक्षिण आफ्रिकेतील इतर ठिकाणांच्या तुलनेत, सेंट जॉर्ज पार्कमध्ये बाऊन्स कमी आहे, जरी नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांना खूप मदत करु शकतो, विशेषत: पहाटेच्या वेळी, ज्यामुळं फलंदाजांना धावा करणं सोपं होतं. जसजसा खेळ पुढं जाईल तसतशी खेळपट्टी अधिक आव्हानात्मक होत जाईल. याशिवाय खेळपट्टी वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटूंना अधिक मदत करु शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेंट जॉर्ज पार्कमध्ये आतापर्यंत एकूण 32 कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 14 सामने जिंकले आहेत, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं 13 सामने जिंकले आहेत.

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवार, 5 डिसेंबर रोजी सेंट जॉर्ज पार्क, गाकबेर्हा इथं भारतीय वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक त्याच्या अर्धातास आधी होईल.

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठं आणि कसा पाहायचा?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका भारतातील टीव्हीवर स्पोर्ट्स 18-1 आणि स्पोर्ट्स 18-1 एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केली जाईल. तसंच जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

दक्षिण आफ्रिका :टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम (यष्टिरक्षक), गेराल्ड कोएत्झी, टोनी डी झोर्झी, मार्को जॅनसेन, केशव महाराज, एडन मार्कराम, मॅथ्यू ब्रिट्झके, सेनुरान मुथुसामी, डेन पॅटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन (यष्टिरक्षक), काइल वेरेन (यष्टीरक्षक)

श्रीलंका : धनंजय डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस (यष्टिरक्षक), कामिंदू मेंडिस, ओशादा फर्नांडो, सदिरा समरविक्रमा (यष्टिरक्षक), प्रभात जयसूर्या, निशान एमबुलन पेरिस, निशान एमबुलन, प्रभात जयसूर्या रत्नायके, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो, लाहिरु कुमारा, कसून राजीथा.

हेही वाचा :

  1. परंपरा प्रतिष्ठा अनुशासन… सामन्याच्या दोन दिवसआधीच प्लेइंग 11 जाहीर, याला म्हणतात 'कॉन्फिडन्स'
  2. दक्षिण आफ्रिकेकडून 'लंकादहन'... पहिल्याच कसोटीत श्रीलंकेचा दारुण पराभव

ABOUT THE AUTHOR

...view details