महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ; शाहीन आफ्रिदीला बनवलं कर्णधार - Shaheen Afridi Captain

Shaheen Afridi Captain : नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर 0-2 असा पराभव पत्करावा लागला. यानंतर पाकिस्तान क्रिकेटची जगभरात नाचक्की झाली आहे. त्यातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं मोठा निर्णय घेत शाहीन आफ्रिदीला कर्णधार बनवलं आहे.

Shaheen Afridi Captain
पाकिस्तान क्रिकेट (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 6, 2024, 2:19 PM IST

नवी दिल्ली Shaheen Afridi Captain : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं स्थानिक चॅम्पियन्स वनडे चषक स्पर्धेसाठी त्यांच्या पाचही संघांच्या संघांची घोषणा केली आहे. 12 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत पाकिस्तानचे सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होत असून या स्पर्धेकडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ऑडिशनप्रमाणे पाहिलं जात आहे. धक्कादायक म्हणजे बाबर आझमला या पाच संघांपैकी कोणत्याही संघाचा कर्णधार बनवण्यात आलेलं नाही. बाबर आझम हा स्टॅलियन्स संघाचा एक खेळाडू असून तो मोहम्मद हरिसच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. बाबरला स्वतः कर्णधार बनायचं नव्हतं, कारण या संघाचा मेंटॉर शोएब मलिक आहे, ज्यांच्याशी त्याचं मतभेद असल्याच्या चर्चा होत्या.

रिझवान-शाहीन यांना मिळालं कर्णधारपद :या वनडे चषकात बाबर आझम कर्णधार होणार नाही. पण, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी चॅम्पियन्स वनडे कपमध्ये नक्कीच कर्णधार होताना दिसतील. मोहम्मद रिजवानला व्हाव्स संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. सौद शकीलला डॉल्फिन्सचा कर्णधार आणि शादाब खानला पँथर्सचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

वनडे चषकावरही प्रश्नचिन्ह : पाकिस्तानच्या या वनडे चषकावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तान वनडे चषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. इंग्लंडला ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी पाकिस्तानचे सर्व मोठे खेळाडू वनडे चषक खेळणार आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानी खेळाडू कसोटी मालिकेसाठी सराव कसा करतील, हा प्रश्न आहे. अलीकडेच पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर 0-2 असा पराभव पत्करावा लागला. आता इंग्लंडकडूनही पराभव झाला तर पाकिस्तान क्रिकेटवर आणखी टीका होऊ शकते.

हेही वाचा :

  1. विराट कोहली घेणार ब्रिटिश नागरिकत्व...? इंग्लंडचं नागरिकत्व घेतल्यानंतर तो भारताकडून खेळेल का? - Virat Kohli UK Citizenship
  2. रवींद्र जडेजाची राजकारणात एंट्री... 'या' पक्षाचा झाला सदस्य, निवडणुकीच्या रिंगणातही उतरणार? - Ravindra Jadeja in politics
  3. लज्जास्पद... मोहम्मद सामीसह 'या' पाच गोलंदाजांनी एका षटकात टाकले सर्वाधिक चेंडू, एकानं तर दिल्या 77 धावा - Unique Cricket Records

ABOUT THE AUTHOR

...view details