मुंबई Ranji Trophy Live Streaming : देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी आणि महत्त्वाची मानली जाणारी रणजी ट्रॉफी आज म्हणजेच 11 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यातील पहिला सामना बडोदा आणि मुंबई यांच्यात होणार आहे. मागील सत्रात मुंबईचा संघ रणजी चॅम्पियन ठरला होता. गेल्या मोसमात मुंबईचा संघ रणजी ट्रॉफीचा विजेता ठरला होता. मार्च 2024 मध्ये, वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईनं विदर्भाचा 169 धावांनी पराभव करुन विक्रमी 42वं देशांतर्गत विजेतेपद जिंकलं होतं. या स्पर्धेचे सर्व सामने सकाळी साडेनऊ वाजल्यापासून खेळवले जातील.
38 संघांचा सहभाग : रणजी ट्रॉफीच्या 90 व्या आवृत्तीत, सर्व 38 संघ दोन विभागांमध्ये विभागले जातील. एलिट डिव्हिजनमध्ये 32 संघ आठ संघांच्या चार गटात विभागले जातील तर प्लेट लीगमध्ये सहा संघ असतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतात आणि विजेते संघ पुढे जातात. प्लेट लीगमधील अव्वल दोन संघ प्लेट फायनलसाठी पात्र ठरतात आणि पुढील वर्षी ते एलिट ग्रुपमध्ये बढती मिळवतात.
रणजी ट्रॉफी 2024-25 संघ आणि गट :
- एलिट गट अ : बडोदा, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, मेघालय, मुंबई, ओडिशा, सर्व्हिसेस आणि त्रिपुरा
- एलिट गट ब : आंध्र प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, हैदराबाद, पुद्दुचेरी, राजस्थान, उत्तराखंड आणि विदर्भ
- एलिट गट क : बंगाल, बिहार, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश
- एलिट गट डी : आसाम, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, झारखंड, रेल्वे, सौराष्ट्र आणि तामिळनाडू
- प्लेट ग्रुप : अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम
आजपासून सुरु होणारे सामने (शुक्रवार 11 ऑक्टोबर ते सोमवार 14 ऑक्टोबर) :
एलिट ग्रुप अ :
- बडोदा विरुद्ध मुंबई, कोटांबी स्टेडियम, वडोदरा, सकाळी 09:30
- जम्मू विरुद्ध काश्मीर विरुद्ध महाराष्ट्र, शेर ई काश्मीर क्रिकेट स्टेडियम, श्रीनगर, सकाळी 09:30
- सर्व्हिसेस विरुद्ध मेघालय, एअरफोर्स कॉम्प्लेक्स ग्राउंड, पालम, नवी-दिल्ली, सकाळी 9:30
- त्रिपुरा विरुद्ध ओडिशा, MBB स्टेडियम, आगरतळा, सकाळी 9:30
एलिट ग्रुप ब :
- हैदराबाद विरुद्ध गुजरात, जिमखाना मैदान, हैदराबाद, सकाळी 9.30
- हिमाचल प्रदेश विरुद्ध उत्तराखंड, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला, सकाळी 9:30
- राजस्थान विरुद्ध पॉंडिचेरी, सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर, सकाळी 9:30
- विदर्भ विरुद्ध आंध्र प्रदेश, व्हीसीए स्टेडियम, सिव्हिल लाइन्स, नागपूर, सकाळी 9:30
एलिट ग्रुप क :
- मध्य प्रदेश विरुद्ध कर्नाटक, होळकर स्टेडियम, इंदूर, सकाळी 09:30
- उत्तर प्रदेश विरुद्ध बंगाल, भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ, सकाळी 09:30
- हरियाणा विरुद्ध बिहार, चौधरी बन्सीलाल क्रिकेट स्टेडियम, लाहली, सकाळी 9:30
- केरळ विरुद्ध पंजाब, सेंट झेवियर्स KCA क्रिकेट मैदान, त्रिवेंद्रम, सकाळी 9:30
एलिट ग्रुप डी :
- आसाम विरुद्ध झारखंड, एसीए स्टेडियम, बारसापारा, गुवाहाटी, सकाळी 9:30
- चंदीगड विरुद्ध रेल्वे, GMSSS से-26 क्रिकेट ग्राउंड, चंदीगड, सकाळी 9:30
- छत्तीसगड विरुद्ध दिल्ली, शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर, सकाळी 9.30
- तामिळनाडू विरुद्ध सौराष्ट्र, श्री रामकृष्ण कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स ग्राउंड, कोईम्बतूर, सकाळी 9:30
कुठं दिसतील लाईव्ह सामने : भारतातील रणजी ट्रॉफी 2024-25 चं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर तसंच वेबसाईटवरुनही लाईव्ह स्ट्रीम पाहू शकाल. तर टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर सामने प्रसारित केले जातील. हे सर्व सामने सकाळी 09:30 वाजल्यापासून खेळवले जातील.
रणजी ट्रॉफीतील सर्व संघ :
आंध्र क्रिकेट संघ : रिकी भुई (कर्णधार), शेख रशीद (उपकर्णधार), अश्विन हेब्बर, श्रीकर भारत (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, हनुमा विहारी, मैरामरेड्डी रेड्डी, ललित मोहन, महीप कुमार, मनीष गोलमारू, मोहम्मद रफी, सत्यनारायण राजू, अभिषेक रेड्डी, चिपुरापल्ली स्टीफन, वामसी कृष्णा, त्रिपुराण विजय
आसाम क्रिकेट संघ : दानिश दास (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सिबशंकर रॉय, राहुल सिंग, सिद्धार्थ सरमाह, भार्गव दत्ता, ऋषव दास, मृण्मय दत्ता, सुमित घाडीगावकर, राहुल हजारिका, मुख्तार हुसेन, परवेझ मुसरफ, रुहीनंदन पेगू, क्रुणाल सरमा, आकाश दास , अभिषेक ठाकुरी
बडोदा क्रिकेट संघ : कृणाल पंड्या (कर्णधार), विष्णू सोलंकी (उपकर्णधार), प्रियांशू मोलिया, मितेश पटेल (यष्टिरक्षक), शिवालिक शर्मा, अतित शेठ, आकाश सिंग, भार्गव भट्ट, राज लिंबानी, लुकमान मेरीवाला, ज्योत्सनील सिंग, अक्षय मोरे. , सुकीर्त पांडे, महेश पिठिया, अभिमन्यूसिंग राजपूत, निनाद राठवा, शाश्वत रावत, लक्षित टोकसिया.
बंगाल क्रिकेट संघ :अनुस्तुप मजुमदार (कर्णधार), अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सुदीप चॅटर्जी, अभिमन्यू ईश्वरन, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हृतिक चॅटर्जी, शाहबाज अहमद, आकाश दीप, आमिर घनी, सुदीप कुमार घरामी, एव्हलिन सिंधू घोष, सुदीप कुमार घारमी. , मोहम्मद कैफ, मुकेश कुमार, प्रदिप्ता प्रामाणिक, ऋषव विवेक, रोहित कुमार, शुवम डे, युधाजित गुहा
बिहार क्रिकेट संघ : वीर प्रताप सिंग (कर्णधार), साकिबुल घनी (उपकर्णधार), बाबुल कुमार, ऋषव राज, सचिन कुमार, साकिब हुसेन, अभिजीत साकेत, मयंक चौधरी, हिमांशू सिंग, ऋषी राज, आयुष लोहारुका, शर्मन निग्रोद, रघुवेंद्र प्रताप सिंग, अनुज राज, शब्बीर खान, हर्ष सिंग, जितीन यादव, यशपाल यादव
चंदीगड क्रिकेट संघ : मनन वोहरा (कर्णधार), राज बावा, गुरिंदर सिंग, संदीप शर्मा, आयुष सिक्का, अरिजित पन्नू, अर्सलान खान, शिवम भांबरी, रोहित धांडा, गौरव पुरी, जगजित सिंग, विशू कश्यप, अंकित कौशिक, निशंक बिर्ला, मयंक सिद्धू
छत्तीसगड क्रिकेट संघ : एकनाथ केरकर (यष्टिरक्षक), भूपेन लालवानी, अजय मंडल, शशांक सिंग, शुभम अग्रवाल, आशुतोष सिंग, आयुष पांडे, जीवेश बत्ते, आशिष चौहान, संजीत देसाई, अमनदीप खरे, रवी किरण, ऋषभ तिजवा, अन्नदेव तिवारी, ऋषभ तिवारी. बरेथ, विश्वास मलिक
दिल्ली क्रिकेट संघ : हिम्मत सिंग (कर्णधार), अनुज रावत (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, यश धुल, क्षितिज शर्मा, नवदीप सैनी, हृतिक शौकीन, हर्ष त्यागी, सिमरजीत सिंग, शिवांक वशिष्ठ, हिमांशू चौहान, ध्रुव कौशिक, मणि ग्रेवाल, जोशी. सिद्धू, मयंक रावत, दिविज मेहरा, सुमित माथूर, प्रणव राजुवंशी, सनत सांगवान
गुजरात क्रिकेट संघ :चिंतन गजा (कर्णधार), आर्य देसाई, प्रियांक पांचाळ, हेत पटेल, उर्विल पटेल (यष्टीरक्षक), अर्जन नागवासवाला, उमंग कुमार (उपकर्णधार), सिद्धार्थ देसाई, मनन हिंगराजिया, प्रयाजितसिंग जडेजा, तेजस पटेल, जयमीत पटेल. , ऋषी पटेल, रिंकेश वाघेला, विशाल जैस्वाल
हिमाचल प्रदेश क्रिकेट संघ : अंकुश बैन्स (यष्टिरक्षक), प्रशांत चोप्रा, एकांत सेन, ऋषी धवन, मयंक डागर, नवीन कंवर, वैभव अरोरा, अर्पित गुलेरिया, अभिषेक कुमार, अमन जैनवाल, अमित कुमार, अभिनंदन भारद्वाज, दिवेश शर्मा, अंकित कलसी, मुकुल नेगी, रजत वर्मा, रोहित ठाकूर, शुभम अरोरा, विपिन शर्मा
हैदराबाद क्रिकेट संघ :टिळक वर्मा (कर्णधार), तन्मय अग्रवाल, तनय थियागराजन, चामा मिलिंद, रक्षन रेड्डी, राहुल सिंग (उपकर्णधार), अभिरथ रेड्डी, अनिकेरेड्डी, धीरज गौड, कार्तिकेय काक, सारनू निशांत, नितेश रेड्डी, राहुल रेड्डी, रा. रोहित रायडू, कोडिमेला हिमातेजा