पर्थ PRSW vs BRHW WBBL 2024 Live Streaming :ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला बिग बॅश लीग 2024 चा 14 वा सामना आज म्हणजेच 05 नोव्हेंबर रोजी पर्थ स्कॉचर्स महिला विरुद्ध ब्रिस्बेन हीट महिला क्रिकेट संघ यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना पर्थच्या WACA स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
दोन्ही संघांची कामगिरी कशी : पर्थ स्कॉचर्स महिला संघानं आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. ज्यात एक जिंकला आहे तर एकाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत पर्थ स्कॉचर्सचा तिसरा सामना ब्रिस्बेन हीटशी होत आहे. हा सामना जिंकून पर्थ स्कॉचर्सच्या नजरा 2 गुण मिळवण्यावर असतील. दुसरीकडे, ब्रिस्बेन हीट महिला संघानं आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यात दोन जिंकले आहेत तर एकात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ब्रिस्बेन हीट महिला संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. परणामी दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :पर्थ स्कॉचर्स महिला विरुद्ध ब्रिस्बेन हीट महिला संघ आतापर्यंत एकूण 20 वेळा आमनेसामने आले आहे. ज्यात ब्रिस्बेन हीटचा वरचष्मा दिसत आहे. ब्रिस्बेन हीट महिला संघानं 12 सामने जिंकले आहेत. तर पर्थ स्कॉचर्स महिला संघानं 8 सामने जिंकले आहेत. त्यामुळं ब्रिस्बेन हीट महिला संघ अधिक मजबूत दिसत आहे हे स्पष्ट झालं आहे.
दिग्गज भारतीय महिला खेळाडू दिसणार : WBBL च्या या 10व्या हंगामात, शिखा पांडे ब्रिस्बेन हीटकडून खेळत असताना, जेमिमाह रॉड्रिग्स देखील त्याच संघाचा एक भाग आहे. भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना ॲडलेड स्ट्रायकर्स संघाचा भाग आहे. दीप्ती शर्मा आणि यास्तिका भाटिया मेलबर्न स्टार्स संघाकडून खेळताना दिसतील, तर पर्थ स्कॉचर्सनं डेलन हेमलथा यांचा समावेश केला आहे.
पर्थ स्कॉचर्स महिला विरुद्ध ब्रिस्बेन हीट महिला यांच्यातील महिला बिग बॅश लीग 2024 चा 14 वा सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?
महिला बिग बॅश लीग 2024 मधील पर्थ स्कॉचर्स महिला विरुद्ध ब्रिस्बेन हीट महिला यांच्यातील 14 वा सामना आज मंगळवार 05 नोव्हेंबर रोजी पर्थच्या WACA स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:40 वाजता होणार आहे.