नवी दिल्ली Neeraj Chopra Meets Manu Bhaker Mother :नीरज चोप्रा आणि मनू भाकर भारतात परतल्यानंतर चर्चेचा विषय बनले आहेत. मनू भाकर आणि नीरज चोप्राचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडीओवरुन मनू भाकर आणि नीरज चोप्राच्या लग्नाची चर्चा सुरु झाली.
एका व्हिडीओमध्ये मनू भाकरची आई सुमेधा भाकर यांनी नीरजचा हात घेत आपल्या डोक्यावर ठेवला. तसंच बराच वेळ दोघांमध्ये चर्चाही झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. या व्हिडीओवरुन मनू भाकर आणि नीरज चोप्राच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. दरम्यान मनू भाकरच्या आईनं आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तो माझ्यासाठी मुलासारखा : सुमेधा भाकर म्हणाल्या की, "नीरजला भेटून मला आनंद झाला. तो माझ्यासाठी मुलासारखा आहे. पॅरिसला गेल्यावर मी भारतीय हॉकी संघातील खेळाडूंना, अमन सेहरावत, नीरज चोप्रा यांना भेटले. त्या सर्वांना भेटून मला खूप आनंद झालाय. मला आशा आहे की, हे सर्व खेळाडू यापुढेही पदकं जिंकत राहतील. देशासाठी चांगलं काम केल्यास त्यांनी अधिक सन्मान मिळेल."
मनू भाकरचे वडील म्हणाले : मनू भाकरचे वडील राम किशन यांनी सांगितलं की, "मनू अजूनही खूप लहान आहे. ती लग्नाच्या वयाचीही नाही. आत्ता त्याबद्दल आम्ही विचारही करत नाही आहोत. मनूची आई नीरजला आपल्या मुलाप्रमाणे मानते," असं वक्तव्य करत मनूच्या वडीलांनी नीरज आणि मनूच्या लग्नाच्या अफवांना फेटाळून लावलं आहे.
ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी : भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकार आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत 2 कांस्यपदकं जिंकली. टोकियो ऑलिम्पिक 2020 चा चॅम्पियन स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं या ऑलिंपिकमध्ये 89.45 मीटर फेक करून रौप्यपदक जिंकलं.
हेही वाचा
- पॅरालिम्पिक 2024 पूर्वी भारताला धक्का; सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू 18 महिन्यांसाठी निलंबित - Paralympics 2024
- सूर्यकुमार यादव मुंबईसाठी बुची बाबू टूर्नामेंट खेळणार - Shreyas Iyer
- मनू भाकर नीरज चोप्राशी लग्न करणार का? मनूच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं - Manu Neeraj Marriage
- 'बहाणे बनवण्यात सुवर्णपदक...', ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीवर गावस्कर संतापले - Paris Olympics 2024