महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

हैदराबादनं बंगळुरुला खतरनाक धुतला; IPL मधील ठोकल्या सर्वाधिक धावा, ट्रॅव्हिस हेडचाही राडा - ipl 2024 - IPL 2024

RCB vs SRH : बेंगळुरूमध्ये ट्रॅव्हिस हेडने गोलंदाजांचा धुव्वा उडवला. हेडने मोसमातील सर्वात वेगवान शतक ठोकलं. त्यानं अवघ्या ३९ चेंडूत शतक झळकावले. त्यानं ४१ चेंडूत १०२ धावा ठोकल्या. हेडच्या बॅटमधून ९ चौकार आणि ८ षटकार आले. सनरायझर्स हैदराबादनं आरसीबीविरुद्ध २८७ धावा करत आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 9:02 PM IST

Updated : Apr 15, 2024, 9:54 PM IST

बंगळुरु RCB vs SRH : इंडियन प्रीमियर लीगच्या ३०व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (RCB) होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना आरसीबीचे होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे.

हेडचा नादच खुळा :या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेडने धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी पॉवरप्लेमध्येच ७१ धावा ठोकल्या. अभिषेक आणि हेडने पहिल्या विकेटसाठी अवघ्या ८ षटकात १०८ धावांची सलामी दिली. यावेळी हेडने अवघ्या २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सनरायझर्स हैदराबादनं इतिहास रचला आहे. हैदराबादनं पुन्हा एकदा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचा विक्रम केलाय. आयपीएलच्या या मोसमात हैदराबादनं बंगळुरूचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला. आयपीएल २०१३ मध्ये आरसीबीनं २६३ धावा केल्या होत्या. हैदराबादने याच मोसमात मुंबईविरुद्ध खेळताना २७७ धावा केल्या होत्या. आता हैदराबादने स्वतःचाच विक्रम मोडला.

Last Updated : Apr 15, 2024, 9:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details