महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फलंदाजी की थट्टा...? भारतीय संघ 46 धावांत गारद; 92 वर्षाच्या भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 'असं' घडलंच नव्हतं - LOWEST SCORE ON HOME SOIL

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 46 धावांत गडगडला. भारतीय संघाच्या पाच फलंदाजांना खातंही उघडता आलं नाही.

Team India All Out on 46
रोहित शर्मा (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 17, 2024, 3:16 PM IST

Updated : Oct 17, 2024, 3:28 PM IST

बेंगळुरु Team India All Out on 46 :भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याचा पहिला दिवस (16 ऑक्टोबर) पावसामुळं वाहून गेला. अशा स्थितीत दुसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात झाली. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय अजिबात योग्य नसल्याचं सिद्ध झालं.

46 धावांत भारताचा खुर्दा : या सामन्यात कीवी वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय संघ असहाय दिसत होता, कीवी वेगवान गोलंदाजांनी ढगाळ वातावरणाचा पुरेपूर फायदा घेत भारताचा पहिला डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला. भारताकडून केवळ यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. पाच फलंदाजांना खातंही उघडता आलं नाही. ऋषभनं 20 आणि यशस्वीनं 13 धावांचं योगदान दिलं. तर न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनं सर्वाधिक 5 बळी घेतले. विल्यम ओरुर्कनं चार आणि टीम साऊथीनं एक विकेट घेतली.

  • तसं पाहिल्यास कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या होती. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमधली ही भारताची सर्वात कमी धावसंख्या ठरली. यापूर्वी 1976 साली वेलिंग्टन कसोटी सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या डावात 81 धावांत आटोपला होता. म्हणजेच भारतीय संघानं आपला 48 वर्ष जुना विक्रम मोडला आहे.
  • कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा डावातील किमान धावसंख्या 36 धावा आहे, जी डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲडलेड कसोटीमध्ये केला होता. यानंतर त्याची दुसरी सर्वात कमी धावसंख्या 42 धावा आहे. जून 1974 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारतीय संघ 42 धावांत गारद झाला होता.
  • भारतीय संघाची घरच्या मैदानावर ही सर्वात कमी धावसंख्या होती. यापूर्वी 1987 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली कसोटी सामन्यात भारतानं पहिल्या डावात 75 धावा केल्या होत्या. तसंच, ही भारतातील कोणत्याही कसोटी सामन्यातील संघाची सर्वात कमी धावसंख्या होती. याआधी न्यूझीलंडनं 2021 मध्ये भारत विरुद्ध मुंबई कसोटी सामन्यात 62 धावा केल्या होत्या.
  • इतकंच नव्हे तर 46 धावा ही आशियातील कोणत्याही संघाची किमान धावसंख्या आहे. याआधी 1986 मध्ये फैसलाबादमध्ये वेस्ट इंडिजनं पाकिस्तानविरुद्ध 53 धावा केल्या होत्या. 2002 मध्ये शारजाहमध्ये पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 53 धावा केल्या होत्या.

भारतातील सर्वात कमी धावसंख्या (कसोटी क्रिकेटमध्ये) :

  • 46 धावा - भारत विरुद्ध न्यूझीलंड, बेंगळुरु, 2024*
  • 62 धावा - न्यूझीलंड विरुद्ध भारत, मुंबई, 2021
  • 75 धावा - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, दिल्ली, 1987
  • 76 धावा - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अहमदाबाद, 2008
  • 79 धावा - दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, नागपूर, 2015

भारताची कसोटी सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या :

  • 36 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ॲडलेड, 2020
  • 42 धावा विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स, 1974
  • 46 धावा विरुद्ध न्यूझीलंड, बेंगळुरु, 2024*
  • 58 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन, 1947
  • 58 धावा विरुद्ध इंग्लंड, मँचेस्टर, 1952

भारतासाठी कसोटी डावात सर्वाधिक फलंदाज शून्यावर आउट :

  • 6 फलंदाज विरुद्ध इंग्लंड, मँचेस्टर, 2014 (पहिला डाव)
  • 6 फलंदाज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केप टाऊन, 2024 (दुसरा डाव)
  • 5 फलंदाज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ॲडलेड, 1948 (तिसरा डाव)
  • 5 फलंदाज विरुद्ध इंग्लंड, लीड्स, 1952 (तिसरा डाव)
  • 5 फलंदाज विरुद्ध न्यूझीलंड, मोहाली, 1999 (पहिला डाव)
  • 5 फलंदाज विरुद्ध न्यूझीलंड, बेंगळुरु, 2024 (पहिला डाव)*

भारतात न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी (एक डाव) :

  • 7/64 - टीम साऊदी विरुद्ध भारत, बेंगळुरु, 2012
  • 6/27- डायोन नॅश विरुद्ध भारत, मोहाली, 1999
  • 6/49 - रिचर्ड हॅडली विरुद्ध भारत, वानखेडे, 1988
  • 5/15 - मॅट हेन्री विरुद्ध भारत, बेंगळुरु, 2024*

न्यूझीलंडसाठी सर्वात जलद 100 कसोटी बळी (सामन्यानुसार) :

  • 25 - रिचर्ड हॅडली
  • 26 - नील वॅगनर
  • 26 - मॅट हेन्री*
  • 27 - ब्रुस टेलर

हेही वाचा :

  1. कीवी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांची शरणागती, 46 धावांत खुर्दा; 11 पैकी 5 खेळाडू शून्यावर आउट
Last Updated : Oct 17, 2024, 3:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details