राजकोट Ind vs Eng 3rd Test : आज भारत आणि इंग्लंड या संघादरम्यान तिसरा क्रिकेट कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून मुंबईकर खेळाडू सरफराज खान आणि ध्रूव जुरैल या दोन खेळाडूंनी भारतीय संघाकडून डेब्यू केला आहे. सरफराज खान हा भारतीय संघाकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत असल्यानं त्याच्या कुटुंबीयांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली. भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर त्याची पत्नी आणि वडील चांगलेच भावुक झाले.
अनिल कुंबळेनं डेब्यू कॅप दिल्यानंतर अश्रू झाले अनावर :आज भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेनं पदार्पणासाठी देण्यात येणारी डेब्यू कॅप दिली. यावेळी सरफराज खानच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. त्याच्या शेजारी असलेली त्याची पत्नीही भावुक झाली. यावेळी सरफराज खानच्या पत्नीलाही अश्रू अनावर झाले. डेब्यू कॅप मिळाल्यानंतर सरफराज खान आणि त्याच्या पत्नीला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. त्यांनी आपल्या भावनेला मोकळी वाट करुन दिली. वडील आणि पत्नीला रडताना पाहून सरफराज खानही भावुक झाला.
भारतीय संघात निवड होण्यासाठी पाहावी लागली वाट :भारतीय क्रिकेट संघात खेळण्यासाठी सरफराज खान यानं मोठी मेहनत केली. त्याला आंतरराष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी त्याला बरीच वाट पहावी लागली. त्यामुळंच त्याच्या निवडीनंतर त्याच्या वडिलांना आणि त्याच्या पत्नीला आपले अश्रू आवरता आले नाही. सरफराज खानच्या करियरसाठी त्याच्या वडिलांनी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे. त्यांना भारतीय संघाकडून कधी खेळता आलं नाही, त्यामुळं आपल्या मुलाला भारतीय संघाकडून खेळण्यासाठी त्यांना वर्षानुवर्षे वाट पहावी लागली. अखेर त्यांचं स्वप्न साकार झालं, त्यांच्या अश्रूवरुन स्पष्ट झालं.
मुलाच्या डोक्यावर ठेवली डेब्यू कॅप अन् :सरफराज खान याची भारतीय संघात निवड झाल्यानंतर त्याला डेब्यू कॅप देण्यात आली. या कॅपचं त्याच्या वडिलांनी चुंबन घेत सरफराजच्या डोक्यावर ठेवली. त्यानंतर त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्याच्या शेजारी असलेल्या त्याच्या पत्नीलाही अश्रू आवरता आले नाहीत. त्याच्या पत्नीनं अश्रूला वाट मोकळी करुन देत सरफराजला मिठी मारुन त्याचं अभिनंदन केलं. हा भावनिक क्षण पाहून उपस्थित भारावून गेले. सरफराज खान यानं आतापर्यंत 66 प्रथम श्रेणी डावात 3 हजार 912 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणीत त्यानं उत्कृष्ट खेळ केल्यानं त्याची सरासरी 69 आहे. यात 14 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. सरफराज खान याचा स्ट्राईक रेट 70.48 इतका आहे.
हेही वाचा :
- भारत Vs इंग्लंड तिसरा कसोटी सामना : रोहित-जडेजानं सावरला भारताचा डाव
- अंडर 19 विश्वचषक फायनल; ऑस्ट्रेलियानं चौथ्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला, भारताचा 79 धावांनी पराभव