विशाखापट्टणम Ind Vs Eng Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथील डॉ.वाय.एस. राजशेखर क्रिकेट स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारतानं पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, इंग्लंडला पहिल्या डावात 253 धावाच करता आल्या. दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसअखेर भारतानं एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या होत्या. दिवसाअखेर भारताकडे 171 धावांची आघाडी होती.
दिवस 3, पहिलं सत्र : रोहित शर्मा (13) आणि यशस्वी जैस्वाल (15) यांनी भारतासाठी तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. भारतासाठी दिवसाची सुरुवात खराब झाली. जेम्स अँडरसननं प्रथम रोहित शर्माला 13 धावांवर आणि नंतर यशस्वी जयस्वालला 17 धावांवर बाद केलं. सध्या श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल क्रिजवर आहेत.
यशस्वी जयस्वालचं द्विशतक : यशस्वी जयस्वालनं पहिल्या डावात द्विशतक झळकावलंय. त्यानं 290 चेंडूत 19 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीनं 209 धावांची स्फोटक खेळी केली. जसप्रीत बुमराहनं पहिल्या डावात शानदार गोलंदाजी करत 6 बळी घेतले. या सामन्यात त्यानं 150 वी कसोटी विकेटही घेतली.