महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

हॅरी 'रेकॉर्ड ब्रेक' ब्रूक... 'कीवीं'विरुद्ध ऐतिहासिक खेळी करत मोडला 'डॉन'चा विक्रम - HARRY BROOK RECORD

इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका 2-0 नं खिशात घातली आहे. इंग्लंडनं दुसऱ्या कसोटी न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभूत केलं.

Harry Brook Record
हॅरी ब्रूक (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 9, 2024, 1:34 PM IST

वेलिंग्टन Harry Brook Record : वेलिंग्टन इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघानं दणदणीत विजय नोंदवला आहे. त्यांनी यजमान कीवी संघाचा 323 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. या विजयासह इंग्लंडनं मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. या सामन्यात अनेक विक्रम पाहायला मिळाले. मात्र हॅरी ब्रूकनं एक मोठा पराक्रम करत इतिहासाच्या पानावर आपलं नाव कोरलंय. विशेष म्हणजे हा विक्रम सचिन, कोहली कोणालाही करता आलेला नाही.

16 वर्षांनी जिंकली मालिका : या सामन्यात बेन स्टोक्सच्या संघानं दुसऱ्या डावात 427 धावा केल्या होत्या आणि पहिल्या डावात 155 धावांच्या आघाडीच्या जोरावर 583 धावांचं महाकाय लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 259 धावांवर गडगडला. या विजयासह इंग्लंडनं मालिका 2-0 अशी घातली असून 16 वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. मात्र, अजून एक सामना बाकी असला तरी त्यात पराभूत होऊनही ही मालिका इंग्लंडच्या नावावर राहणार आहे.

हॅरी ब्रूक आणि रुट ठरले विजयाचे हिरो :इंग्लंडकडून हॅरी ब्रूक, जो रुट आणि गस ऍटकिन्सन यांनी इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या डावात अवघ्या 43 धावांत 4 विकेट गमावल्यानंतर ब्रूकनं ऑली पोपसोबत 174 धावांची भागीदारी केली. त्यानं 115 चेंडूत 123 धावांची स्फोटक खेळी करत इंग्लंडला 280 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावातही त्यानं अर्धशतक झळकावलं. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. दुसऱ्या डावात जो रुटनं 106 धावांची खेळी केली आणि 583 धावांचं मोठं लक्ष्य ठेवण्यात मदत केली.

हॅरी ब्रूकनं डॉनला टाकलं मागे : इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकनं न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. या शतकी खेळीसह त्यानं एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्यानं दिग्गज डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडीत काढला आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर किवीजचा धुव्वा उडवणाऱ्या ब्रूकनं या सामन्यात 115 चेंडूत 5 षटकार आणि 11 चौकारांसह 123 धावा केल्या. हॅरी ब्रूकनं या शतकासह एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. पहिल्या 10 विदेशी कसोटी सामन्यात सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम डॉन ब्रॅडमनच्या नावावर होता.

काय आहे विक्रम : माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या पहिल्या 10 परदेशात कसोटी सामन्यांमध्ये 6 शतकं झळकावण्याचा विक्रम केला होता. हा विश्वविक्रम कोणीही मोडू शकलेलं नाही. मात्र हॅरी ब्रूकनं विदेशात खेळल्या पहिल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये 7 शतकं ठोकली आहेत. आता ब्रुकच्या नावावर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या 10 विदेशी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विश्वविक्रम झाला आहे.

हेही वाचा :

  1. दुष्काळात तेरावा महिना... तिसऱ्या कसोटी सामन्यातून दिग्गज खेळाडू संघाबाहेर
  2. करेबियन संघाची प्रतीक्षा संपली...! 2189 दिवसांनी जिंकली मॅच

ABOUT THE AUTHOR

...view details