नवी दिल्लीBCCI and Players Annual Contract : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) बुधवारी 2023-24 हंगामातील खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर केलाय. हे करार भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघासाठी 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत लागू असतील. या करारामध्ये एकूण 30 खेळाडूंचा समावेश आहे. यात केवळ चार खेळाडूंना A+ श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे. तर युवा खेळाडू यशस्वी जैस्वालचा बी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. करारात ग्रेड A+, ग्रेड A, ग्रेड B आणि ग्रेड C मध्ये असं वर्गीकरण करण्यात आलं आहे. तसंच त्यांचं वार्षिक उत्पन्न श्रेणींनुसार ठरविण्यात आलं आहे.
अय्यर, इशान करारातून बाहेर : बीसीसीआयनं फलंदाज श्रेयस अय्यर तसंच यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन यांना या करारातून वगळलं आहे. याव्यतिरिक्त, जे खेळाडू चालू कालावधीत किमान 3 कसोटी किंवा 8 एकदिवसीय सामने किंवा 10 T20 खेळण्याचे निकष पूर्ण करतात. त्यांना सी ग्रेडमध्ये समाविष्ट केलं जाईल. यात ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनी आतापर्यंत 2 कसोटी सामने खेळले आहेत. जर ते धर्मशाला कसोटी सामन्यात भारतीय संघात समाविष्ट असल्यास त्यांना C ग्रेडमध्ये समाविष्ट केलं जाईल.
- A+ ग्रेड (4 खेळाडू)
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा
- ग्रेड A (6 खेळाडू)