महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

हे काय... ऑस्ट्रेलियन कर्णधाराला स्कॉटलंडविरुद्ध मालिका विजयानंतर मिळाला 'कटोरा' - Hilarious T20 Trophy - HILARIOUS T20 TROPHY

Scotland vs Australia Hilarious Trophy : इंग्लंड दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ त्यांच्या देशापासून 15 हजार 182 किमी दूर स्कॉटलंडमध्ये होता. त्यांच्या तिथं असण्याचं कारण टी 20 मालिका होती. त्या मालिकेत त्यांनी क्लीन स्वीप केलं. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधाराला ट्रॉफीच्या बदल्यात एक 'कटोरा' देण्यात आली.

Scotland vs Australia
ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 11, 2024, 12:59 PM IST

नवी दिल्ली Scotland vs Australia Hilarious Trophy :मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. पण, इंग्लंडला जाण्यापूर्वी त्यांनी स्कॉटलॅंडचा दौरा केला होता. जे ऑस्ट्रेलियापासून 15 हजार 182 किमी दूर आहे. ऑस्ट्रेलियन संघ इथं 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेला होता. ऑस्ट्रेलियानं सप्टेंबरमध्ये या दौऱ्यावर 3-0 नं मालिका जिंकली होती. पण त्यानंतर त्याच्या कर्णधाराला चषक नाही तर 'कटोरा' देण्यात आला.

विजयानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराला मिळाला 'कटोरा' : क्रिकेटमध्येही विजयी संघ किंवा त्याच्या खेळाडूंबाबत विचित्र गोष्टी घडल्या आहेत. स्कॉटलंडमध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडे सोपवण्यात आलेला 'कटोरा'ही त्यापैकीच एक आहे. बरं, जर तुम्ही या 'कटोऱ्या'ला एक सामान्य भांडं मानण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. या 'कटोऱ्या'ला स्वतःचं एक महत्त्व आहे.

'कटोऱ्या'चं स्वतःचं महत्त्व : स्कॉटलंडविरुद्ध टी 20 मालिका जिंकल्यानंतर प्रजेन्टरनं ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शकडे जो 'कटोरा' दिला त्याला स्कॉटिश स्मृती चिन्ह म्हणतात. ज्याचा वापर व्हिस्की ठेवण्यासाठी केला जातो. स्कॉटलंडचं राष्ट्रीय पेय व्हिस्की या 'कटोऱ्या'त ओतलं गेलं आणि सर्व खेळाडूंनी प्रत्येकी एक घोट प्याला. या स्कॉटिश परंपरेला अनुसरुन ऑस्ट्रेलियन संघानंही 'कटोऱ्या'सोबत ग्रुप फोटोसाठी पोज दिली. संघ ट्रॉफींबाबत नेमके हेच करतात.

इंग्लंडमध्ये 3 टी 20 आणि 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका : स्कॉटलंडमध्ये टी 20 मालिका जिंकून पारंपारिक चषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडला रवाना झाला. ऑस्ट्रेलियाला इंग्लंडमध्ये 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळायची आहे, जी 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाईल. तसंच 15 सप्टेंबरपासून उभय संघांमध्ये 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. ही एकदिवसीय मालिका 29 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

हेही वाचा :

  1. क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; पंतप्रधानांनी कॅप्टनला हटवून चक्क बॅटिंगला सुरुवात केली, मैदानात उडाला गोंधळ - PM Play Cricket
  2. विश्वचषक अन् सूर्यकुमार यादवचा अफलातून 'झेल'; गणपतीसमोर साकारला अनोखा देखावा - Ganeshotsav 2024

ABOUT THE AUTHOR

...view details