पर्थ AUS vs PAK 3rd ODI Live Streaming :ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज 10 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला वनडे सामना यजमान जिंकत ऑस्ट्रेलियानं मालिकेत 1-0 अशी आघाडी होती. मात्र दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं दणदणीत विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता आजचा सामना जिंकत दोन्ही संघांचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न असेल. पाकिस्ताननं यापुर्वी 2002 मध्ये ऑस्ट्रेलियात शेवटची मालिका जिंकली होती. त्यानंतर त्यांना कांगारुंच्या देशात मालिका जिंकता आलेली नाही.
दुसऱ्या वनडेत काय झालं : ॲडलेड इथं झालेल्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियन संघ प्रचंड फ्लॉप ठरला. ना त्यांच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली ना त्यांचे गोलंदाज आपली ताकद दाखवू शकले. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना 35 षटकांत केवळ 163 धावा केल्या, प्रत्युत्तरात पाकिस्तान संघानं 26.3 षटकांत हे लक्ष्य सहज गाठलं होतं. यासह त्यांनी ॲडलेडच्या मैदानावर 28 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. तसंच जवळपास साडेसात वर्षांनी पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियात वनडे सामना जिंकला होता. हीच विजयी लय सामन्यातही कायम ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचे संघ आतापर्यंत 110 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. ऑस्ट्रेलियानं 110 पैकी 71 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्ताननं केवळ 35 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना बरोबरीत तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळं ऑस्ट्रेलिया पाकिस्तानपेक्षा बलाढ्य आहे हे स्पष्ट झालं आहे. याआधी दोन्ही संघांनी शेवटची वनडे मालिका 2022 मध्ये खेळली होती.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात तिसरा वनडे सामना कधी होणार?
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा वनडे सामना रविवार, 10 नोव्हेंबर रोजी पर्थ इथं भारतीय वेळेनुसार सकाळी 9:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक अर्धातास आधी म्हणजे सकाळी 08:30 वाजता होईल.