महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दशकभरानंतर 'साहेबां'चा संघ 'अ‍ॅशेस' जिंकणार की यजमान वर्चस्व कायम ठेवणार? प्रतिष्ठित मॅच 'इथं' पाहा लाईव्ह - AUSW VS ENGW 1ST ODI LIVE

क्रिकेटमधील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात होतं आहे. यात गेल्या 10 वर्षांपासून इंग्लंडला विजय मिळवता आलेला नाही.

AUSW vs ENGW 1st ODI Live
अ‍ॅशेस मालिका (ECB X Handle)

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 11, 2025, 11:04 AM IST

Updated : Jan 11, 2025, 11:38 AM IST

सिडनी AUSW vs ENGW 1st ODI Live Stream :क्रिकेटमधील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात होत आहे. ज्यात ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात सामने खेळवले जातील. महिलांची अ‍ॅशेस 12 जानेवारीपासून सुरु होत आहे. जिथं दोन्ही संघांमध्ये एकूण सात सामने खेळले जातील. ज्यात तीन वनडे सामने, तीन T20 आंतरराष्ट्रीय सामने आणि एक कसोटी सामना असेल.

10 वर्षांपासून इंग्लंडला विजयाची प्रतिक्षा : दोन्ही संघांमधील शेवटची अ‍ॅशेस मालिका खूप रोमांचक होती. जिथं ऑस्ट्रेलियानं पॉइंट्स टेबलवर 8-8 अशा रोमांचक बरोबरीनंतर अ‍ॅशेस कायम ठेवली. यावेळीही चाहत्यांना अनेक रोमांचक सामन्यांची अपेक्षा आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व एलिसा हिलीकडे आहे. तर हीदर नाईट इंग्लंडचं नेतृत्व करत आहे. इंग्लंडनं शेवटचं विजेतेपद 2014-15 मध्ये जिंकलं होतं. यानंतर त्यांना ही प्रतिष्ठित मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळं आता 10 वर्षांनंतर इंग्लंडचा संघ ही मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. तर यजमान ऑस्ट्रेलिया संघ ही मालिका जिंकत आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

महिला अ‍ॅशेस 2025 कधी सुरु होईल?

महिला अ‍ॅशेस 2025 रविवार, 12 जानेवारी रोजी सुरु होईल आणि शेवटचा सामना (कसोटी) 30 जानेवारीपासून खेळला जाईल.

महिला अ‍ॅशेस 2025 सामने किती वाजता सुरु होतील?

महिला अ‍ॅशेस 2025 मधील पहिला वनडे सामना सकाळी 5:00 वाजता सुरु होईल आणि उर्वरित दोन वनडे सामने पहाटे 4:35 वाजता सुरु होतील. तर तिन्ही T20 सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1:45 वाजता सुरु होतील आणि एकमेव कसोटी सामना 30 जानेवारी रोजी सकाळी 9:00 वाजता सुरू होईल. या सर्व वेळा भारतीय वेळेनुसार आहेत.

महिला अ‍ॅशेस 2025 कुठं खेळवली जाईल?

महिला अ‍ॅशेस 2025 ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे. यातील सामने सिडनी, नॉर्थ सिडनी, मेलबर्न, होबार्ट, अॅडलेड आणि कॅनबेरा इथं खेळवले जातील.

भारतात महिला अ‍ॅशेस 2025 चं कुठं आणि कसं पाहू शकता?

भारतीय क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर महिला अ‍ॅशेस 2025 सामन्यांचं थेट प्रक्षेपण पाहू शकतात. तसंच महिला अ‍ॅशेस 2025 चे सामने डिस्ने+हॉटस्टार अॅप्लिकेशन आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहेत.

महिला अ‍ॅशेस 2025 संघ :

  • ऑस्ट्रेलियाचा वनडे संघ : एलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, अ‍ॅशले गार्डनर, किम गार्थ, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शट, अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वॉल, जॉर्जिया वेअरहॅम.
  • ऑस्ट्रेलियाचा T20 संघ : एलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, अ‍ॅशले गार्डनर, किम गार्थ, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शट, अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वॉल, जॉर्जिया वेअरहॅम.
  • ऑस्ट्रेलिया कसोटी संघ : अद्याप जाहीर झालेला नाही
  • इंग्लंडचा वनडे संघ : हीथर नाईट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, लॉरेन बेल, माया बाउचियर, अॅलिस कॅप्सी, केट क्रॉस, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फिलर, सारा ग्लेन, एमी जोन्स, नॅट सायव्हर-ब्रंट, डॅनी वायट. - हॉज.
  • इंग्लंडचा T20 संघ : हीथर नाईट (कर्णधार), लॉरेन बेल, माया बोचियर, अॅलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फिलर, डॅनिएल गिब्सन, सारा ग्लेन, बेस हीथ, एमी जोन्स, फ्रेया केम्प, लिन्सी स्मिथ, नॅट. सायव्हर-ब्रंट, डॅनी व्याट-हॉज.
  • इंग्लंड कसोटी संघ : हीथर नाईट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, लॉरेन बेल, माया बाउचियर, केट क्रॉस, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फिलर, बेस हीथ, एमी जोन्स, रियाना मॅकडोनाल्ड-गे, नॅट सायव्हर-ब्रंट, डॅनी व्याट-हॉज.

हेही वाचा :

  1. 10 देशांमध्ये शतक, क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक झेल; 'द वॉल'चे अनब्रेकेबल रेकॉर्ड्स
  2. तीन दिवसांत दुसरा सामना जिंकत यजमान पाहुण्यांना क्लीन स्वीप करणार? निर्णायक मॅच 'इथं' पाहा लाईव्ह
Last Updated : Jan 11, 2025, 11:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details