होबार्ट :ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला सामना 11 धावांनी जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 213 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण वेस्ट इंडिजचा 11 धावांनी पराभव झाला. या सामन्यात डेव्हिड वॉर्नर विजयाचा शिल्पकार ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय :ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-20 सामना कांगारूंनी जिंकलाय. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियानं 20 षटकांत 7 गडी गमावून 213 धावा करत विजयासाठी 214 धावांचं आव्हान ठेवलं. वेस्ट इंडिजनं 8 विकेट गमावून 202 धावा केल्या. यासोबतच पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजला 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा आक्रमक अंदाज या सामन्यात पाहायला मिळाला. त्यानं 36 चेंडूत 70 धावा केल्या. त्यात 12 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. याशिवाय जोश इंग्लिश आणि टीम डेव्हिड यांनी चांगली खेळी केली. वेस्ट इंडिजकडून रसेलनं 3, अल्झारी जोसेफनं 2 आणि होल्डर आणि शेफर्डनं प्रत्येकी एक विकेट घेतली.
डेव्हिड वॉर्नरनं रचला इतिहास : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट येथे खेळवला गेला. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या स्फोटक खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 213 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरचा हा 100 वा T20 आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात वॉर्नरनं 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 36 चेंडूत 194.44 च्या स्ट्राइक रेटनं 70 धावा केल्या. त्यामुळं डेव्हिड वॉर्नर हा पहिला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे, ज्यानं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळले आहेत. याशिवाय ही कामगिरी करणारा वॉर्नर जगातील तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. वॉर्नरनं आपल्या 100व्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 धावांची करत इतिहास रचला आहे.