महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्वविजेत्या दिग्गज भारतीय क्रिकेटपटूविरुद्ध अटक वॉरंट; क्रिकेट विश्वात खळबळ - ARREST WARRANT

भारताच्या माजी क्रिकेटपटू विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्याच्यावर APAFO मध्ये फसवणुकीचा आरोप आहे.

Robin Uthappa Arrest Warrant
दिग्गज भारतीय क्रिकेटपटूविरुद्ध अटक वॉरंट (Getty Images)

By ETV Bharat Sports Team

Published : 4 hours ago

नवी दिल्ली Robin Uthappa Arrest Warrant : भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्याच्यावर APAFO मध्ये फसवणुकीचा आरोप आहे. रिपोर्ट्सनुसार, उथप्पानं आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून 23 लाख रुपये कापले पण ते त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केले नाहीत. या कारणास्तव 4 डिसेंबर रोजी त्याला अटक करण्याचं वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मात्र, त्याला संपूर्ण रक्कम भरण्यासाठी 27 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात वेळेवर पैसे जमा केले नाहीत तर त्याला तुरुंगात जावं लागू शकतं.

काय आहे संपूर्ण प्रकरण? : वास्तविक, रॉबिन उथप्पा बेंगळुरुमध्ये कपड्यांची कंपनी चालवतो. पीएफ आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, या कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2336602 रुपये जमा करायचे होते. पण पैसे कापूनही कंपनीनं तसं केलं नाही, त्यामुळं उथप्पाविरुद्ध पूर्व बेंगळुरुमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आलं. मात्र, उथप्पा गेल्या काही वर्षांपासून वॉरंटमध्ये दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे पोलिसांनी सांगितलं.

अधिकृत तक्रार नाही :सध्या उथप्पा दुबईत आहे. पोलिसांनी पीएफ कार्यालयालाही याबाबत माहिती दिली असून आता ही बाब त्यांच्या अखत्यारीत येत नसल्याचं सांगितलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सध्या तरी उथप्पाविरोधात कोणतीही अधिकृत एफआयआर किंवा तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. त्याला केवळ पीएफ कार्यालयातून अटक वॉरंटचे आदेश मिळाले आहेत. उथप्पा पूर्वी बेंगळुरूच्या व्हीलर रोडवरील पुलकेशीनगरमध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहत होता.

रॉबिन उथप्पाची कारकीर्द कशी : रॉबिन उथप्पानं 2006 आणि 2007 T20 मध्ये भारताकडून वनडे पदार्पण केलं. 2015 मध्ये त्यानं भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या कालावधीत उथप्पानं 46 वनडे सामन्यांमध्ये 25.94 च्या सरासरीनं 934 धावा केल्या ज्यात 6 अर्धशतकांचाही समावेश आहे. त्यानं 13 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 24.90 च्या सरासरीनं 249 धावा केल्या. 2007 च्या T20 विश्वचषक विजेत्या संघाचाही तो एक भाग होता. IPL बद्दल बोलायचं झालं तर त्यानं एकूण 205 सामने खेळले आणि 27.51 च्या सरासरीनं आणि 130 च्या स्ट्राईक रेटनं 4952 धावा केल्या. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचा भाग होता.

हेही वाचा :

  1. 'बॉक्सिंग डे टेस्ट' कशाला म्हणतात आणि ती मेलबर्नमध्ये का खेळली जाते? वाचा सविस्तर इतिहास
  2. इंग्लंडमध्ये जन्म, कींवींकडून क्रिकेट पदार्पण आता वेगवान गोलंदाजीनं मोडला ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा कणा

ABOUT THE AUTHOR

...view details