महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

T20 विश्वचषकात कांगारुंविरुद्ध 'मॅचविनिंग' खेळी करणारा खेळाडू संघाबाहेर; युवा खेळाडूंसह संघ जाहीर - AFGHANISTAN SQUAD ANNOUNCED

अफगाणिस्ताननं झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे आणि T20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. वनडे संघाची कमान हशमतुल्ला शाहिदीच्या हाती आहे. राशिद खानला T20 संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे.

Squad for ODI and T20 Series
अफगाणिस्तान क्रिकेट संघ (AFP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 2, 2024, 9:42 AM IST

काबुल Squad for ODI and T20 Series : अफगाणिस्तान क्रिकेट संघाला डिसेंबरमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध तीन वनडे आणि तीन T20 सामन्यांची मालिका खेळायची असून आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं या दोन्ही मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. स्टार ऑफस्पिनर मुजीब उर रहमानचं संघात पुनरागमन झालं आहे. हाताच्या दुखापतीमुळं तो बाहेर गेला होता. याआधी तो नोव्हेंबरमध्ये अबू धाबी T10 लीगमध्ये खेळताना दिसला होता. तर फलंदाज जुबैद अकबरीला प्रथमच अफगाणिस्तानच्या T20 संघात स्थान मिळालं आहे.

जुबैद अकबरीनं केली चमकदार कामगिरी : गेल्या काही काळापासून जुबैद अकबरीला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली. त्यानं ती दोन्ही हातांनी पकडली आहे. इमर्जिंग आशिया कप T20 स्पर्धेत आपल्या खेळानं सर्वांना प्रभावित करण्यात तो यशस्वी ठरला होता आणि अफगाणिस्तान अ साठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. तेव्हा त्यानं चार सामन्यांत 131.73 च्या स्ट्राईक रेटनं 137 धावा केल्या. दुखापतग्रस्त इब्राहिम झाद्रानचा अफगाण संघात समावेश नसल्यानं त्याला पदार्पणाची संधीही मिळू शकते. इंग्लंडविरुद्ध त्याला दुखापत झाली होती. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या T20 विश्वचषकात अफगाणिस्ताननं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं, त्या सामन्यात इब्राहिम झाद्राननं अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दरवेश रसूलीच्या नेतृत्वाखाली जिंकला इमर्जिंग आशिया कप : 24 वर्षीय युवा खेळाडू दरवेश रसूलीलाही संघात संधी मिळाली आहे. त्याच्या नेतृत्वाखालीच अफगाण संघानं इमर्जिंग आशिया कपचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानं संघासाठी 7 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत, ज्यात त्यानं एकूण 51 धावा केल्या आहेत. जानेवारी 2024 मध्ये त्यानं शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर युवा फिरकी गोलंदाज नूर अहमदची केवळ T20 संघात निवड झाली आहे.

मुख्य निवडकर्त्यांनी युवा खेळाडूंसाठी सांगितली मोठी गोष्ट : एसीबीचे अंतरिम मुख्य निवडकर्ता अहमद शाह म्हणाले की, फिरकीपटू मुजीब उर रहमानला दुखापतीतून सावरताना आणि निवडीसाठी उपलब्ध होताना पाहून खूप आनंद होतो. तो आमच्या संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे आणि आम्हाला आशा आहे की तो अफगाणिस्तानसाठी चांगली कामगिरी करत राहील. झुबैद अकबरी आणि दरविश रसूली हे केवळ देशांतर्गत क्रिकेटमध्येच नव्हे तर अलीकडेच संपलेल्या ACC इमर्जिंग टीम्स कपमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत, ज्यात अफगाणिस्ताननं विजेतेपद पटकावलं.

मालिकेचं वेळापत्रक :

  • पहिला T20 सामना : 11 डिसेंबर
  • दुसरा T20 सामना : 13 डिसेंबर
  • तिसरा T20 सामना : 14 डिसेंबर
  • पहिला वनडे सामना : 17 डिसेंबर
  • दुसरा वनडे सामना : 19 डिसेंबर
  • तिसरा वनडे सामना : 21 डिसेंबर

अफगाणिस्तान वनडे संघ : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमत शाह (उपकर्णधार), रेहमानुल्ला गुरबाज (यष्टिरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टिरक्षक), अब्दुल मलिक, सेदीकुल्लाह अटल, दरवेश रसूली, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, रशीद खान, नांग्याल खरोती, एएम गझनफर, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, बिलाल सामी, नवीद झदरन आणि फरीद अहमद मलिक.

अफगाणिस्तान T20 संघ : राशिद खान (कर्णधार), रेहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक), सेदीकुल्लाह अटल, हजरतुल्ला झाझई, मोहम्मद नबी, दरवीश रसूली, जुबैद अकबरी, गुलबद्दीन नायब, करीम जनात, अजमातुल्ला उमरझाई, नांग्याल खरोती, मुजीब उरझाई, नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद आणि नवीन उल हक.

हेही वाचा :

  1. पैसा वसूल...! IPL मध्ये ₹2.60 कोटींत विकलेल्या खेळाडूनं 'कीवीं'विरुद्ध पहिल्याच सामन्यात केला विश्वविक्रम
  2. वर्ल्ड रेकॉर्ड... कसोटीच्या एकाच दिवसात 27 विकेट्स

ABOUT THE AUTHOR

...view details