मेष (Aries) : हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्य आहे. आपल्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव असू शकतो. समस्यांचं निराकरण आपण सहजपणे करू शकाल. या आठवड्यात वायफळ खर्च होण्याची शक्यता असल्यानं त्यावर नियंत्रण ठेवा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना जर नोकरीत बदल करायची इच्छा असेल तर या आठवड्यात त्यांनी तो बदल करू नये. विद्यार्थ्यांनी या आठवड्यात मन लावून अभ्यास करावा. या आठवड्यात कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण घेऊ नये, अन्यथा आपल्या प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच थंड पदार्थ खाणे टाळावे, अन्यथा खोकला, सर्दी, ताप इत्यादींचा त्रास आपणास होऊ शकतो.
वृषभ (Taurus) : हा आठवडा प्रेमीजनांसाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेच्या सहवासात रोमँटिक क्षण घालवू शकाल. वैवाहिक जीवनातील परिस्थिती काहीशी प्रतिकूल असू शकते. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या मजबूत राहील. आपण जर पूर्वी काही आर्थिक गुतंवणूक केली असेल तर या आठवड्यात त्याचा लाभ प्राप्त होऊ शकतो. व्यापाऱ्यांना या आठवड्यात थोडे सावध राहावे लागेल. त्यांना व्यवसायात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्यांना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर मेहनत केली तर त्यांना यश प्राप्ती होऊ शकते. आपणास जर पोटाचे किंवा इतर विकारांचे त्रास होत असले तर त्याकडं दुर्लक्ष करू नये.
मिथुन (Gemini) : हा आठवडा आपल्यासाठी ठीक आहे. आपला वैवाहिक जोडीदार आपणास वेळ देऊ शकणार नाही. एखादे आर्थिक नुकसान होण्याची संभावना असल्यानं सावध राहावे. जग तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर त्यात पुढे जाऊ शकतात. हा आठवडा तसे करण्यास अनुकूल आहे. आपण जर स्पर्धेची तयारी करत असाल तर आपणास आपले श्रम वाढवावे लागतील. त्यामुळं आपणास यश प्राप्ती सुद्धा होऊ शकते. या आठवड्यात आपला एखादा जुना विकार उफाळून येण्याची संभावना आहे. तेव्हा एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा, म्हणजे आपणास बरे वाटू शकेल.
कर्क (Cancer) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण ज्या व्यक्तीस पसंत करत होता अशी एखादी जुन्या मैत्रीतील व्यक्ती या आठवड्यात आपणास भेटण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या जीवनात काही वेगळे आणि नवीन करण्याचा प्रयत्न करतील. आपणास जर आर्थिक मदत हवी असेल तर आपले मित्र आपणास पूर्ण सहकार्य करू शकतील. ते आपणास आर्थिक मदत करू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी कार्यक्षेत्री राजकारण करण्यापासून दूर राहावे, अन्यथा नोकरीत त्याचा त्रास होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. त्यांनी फक्त अध्ययनात कोणतीही कसर करू नये, मग यश त्यांचेच आहे. या आठवड्यात आपणास आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावं लागेल. विशेषतः सकाळचे चालणे, व्यायाम आणि योगासन यासाठी वेळ काढावा.
सिंह (Leo) :हा आठवडा आपल्यासाठी सकारात्मक असू शकतो. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळं आपल्या प्रेमिकेवर शंका घेऊन आपले प्रणयी जीवन बिघडू नका. आपल्या वैवाहिक संबंधात माधुर्य येण्यासाठी आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. या आठवड्यात आपण जमीन किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. तसेच काही प्रतिष्ठित व्यक्तींशी आपली भेट होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या नोकरीत बदल करू नये. आपण जेथे आहात तेथेच राहावे. इथेच आपणास प्रगतीची संधी प्राप्त होऊ शकते. आपण जर एखाद्या स्पर्धेची किंवा उच्च शिक्षणाची तयारी करत असाल तर पूर्ण मन लावून अभ्यास करावा. या आठवड्यात आपण जर थंड, आंबट पदार्थ खाणे न टाळल्यास आपला घसा खराब होऊ शकतो.
कन्या (Virgo) : हा आठवडा आपणास मिश्र फलदायी आहे. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्या व्यक्तीशी काही गैरसमज झाल्यानं आपल्या दोघात तणाव निर्माण होऊ शकतो. तेव्हा आपल्या प्रेमिकेशी मोकळेपणाने बोलणे हिताचे होईल. या आठवड्यात आपल्या प्राप्तीत वृद्धी होण्याची संभावना असली तरी खर्च वाढण्याची संभावना सुद्धा आहे. या आठवड्यात अशा एखाद्या अनुभवी व्यक्तीशी आपली ओळख होईल, जी व्यापार वृद्धीत खूपच चांगली मदत करू शकेल. या आठवड्यात ऋतुजन्य विकारांच्या त्रासाने आपण त्रस्त होऊ शकता. तेव्हा आपली तंदुरुस्ती टिकविण्यासाठी नियमितपणे योगासने करावीत. कदाचित आपल्या शरीरात एखाद्या व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. तेव्हा वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्यात. गरज भासल्यास काही औषधे सुद्धा घेऊ शकता.