मेष (Aries) : हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी असण्याची संभावना आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल असा एखादा अचानक धनलाभ आपणास आठवड्याच्या सुरूवातीसच होऊ शकतो. कारकिर्द आणि व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊन आपली प्रगती उंचावेल. महिलांची धर्म-कर्म प्रति रुची वाढून त्यांचे समाधान होईल. व्यवसायात आपणास आशास्पद प्रगती होत असल्याचं दिसेल. असं असलं तरी आर्थिक देवाण-घेवाण करताना आपणास सतर्क राहावे लागेल. तसेच इतरांवर नजर ठेवावी लागेल. आठवड्याच्या अखेरपर्यंत आपणास एखाद्या धार्मिक किंवा मांगलिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्याने आपण आनंदित व्हाल. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या प्रेमिकेवरील प्रेमात आणि सामंजस्यात सुधारणा होईल. दांपत्य जीवन सुखद होईल. आरोग्याच्या बाबतीत आठवडा सामान्य असला तरी आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मुलांशी संबंधित एखाद्या समस्येचे निराकरण झाल्यानं आपण संतुष्ट व्हाल.
वृषभ (Taurus) : या आठवड्यात आपणास जीवनातील विविध पैलूंवर विचार करावा लागेल, अन्यथा अविचारानं एखादे पाऊल उचलण्यानं विनाकारण समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळं आपली कामे वेळेवर करण्यासाठी आपणास अतिरिक्त प्रयत्न आणि परिश्रम करावे लागतील. आठवड्याच्या सुरूवातीस कामाचा बोजा जास्त असेल. अशावेळी मित्रांचे सहकार्य सुद्धा अपेक्षेहून कमीच मिळेल. व्यापाऱ्यांसाठी आठवड्याची सुरूवात काहीशी प्रतिकूल झाली तरी आठवड्याच्या अखेरपर्यंत झालेला अनपेक्षित लाभ आपल्या आनंदास कारणीभूत होईल. जमीन-घर ह्या संबंधित वाद आपल्या चिंतेचे मुख्य कारण होऊ शकते. प्रणयी जीवनातील गैरसमज संवादाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करावा. परीक्षा आणि स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावं लागतील.
मिथुन (Gemini) : हा आठवडा आपल्यासाठी संघर्षमय असू शकतो. परंतु आपली मेहनत आणि संघर्ष आपणास यशाच्या मार्गावर नेऊन सोडेल. आठवड्याच्या सुरूवातीस काही समस्या असू शकतात, परंतु आठवड्याच्या अखेरपर्यंत आपणास सुखद परिणाम मिळतील. कामानिमित्त जवळचा किंवा दूरवरचा एखादा प्रवास संभवत असल्यानं आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरची कामे करणाऱ्यांना मानसिक तणावाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. विद्यार्थ्यांना अध्ययनात योग्य प्रमाणात लक्ष द्यावं लागेल. प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. आठवड्या अखेरीस प्रेमिकेकडून आपणास एखादी भेटवस्तू मिळू शकते. आपले दांपत्य जीवन सुखद होईल. ह्या आठवड्यात एखादी प्रतिष्ठित व्यक्ती मदतीसाठी आपणास सहकार्य करेल.
कर्क (Cancer) :हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस काही कामात अडथळे येऊ शकतात. त्यामुळं आपले मन खिन्न होण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात एखादी दुखापत किंवा दुर्घटना होण्याची संभावना असल्यानं आपणास वाहन सावधपणे चालवावे लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या प्राप्तीच्या साधनांवर गदा येऊ शकते. व्यापाऱ्यांना त्यांच्या स्पर्धकांना कडवी झुंज द्यावी लागू शकते. आठवड्याच्या मध्यास कामे वाढतील. महिलांना कार्यालय आणि घर ह्यात समतोल साधणे अवघड होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी आपणास जोडीदारासाठी थोडा वेळ काढावा लागेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा विशेष अनुकूल नाही. आपल्या प्रेमाचे प्रदर्शन मांडू नये, तसेच ते जगजाहीर सुद्धा करू नये. आपल्याला कोणतेही पाऊल विचारपूर्वकच उचलावे लागेल, अन्यथा आपणास समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
सिंह (Leo) :हा आठवडा आपल्यासाठी चांगले परिणाम घेऊन येत आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवड्याची सुरूवात अत्यंत शुभ असेल. आपण जर दीर्घ काळापासून जमीन-घर खरेदी करण्याचा विचार करत असलात तर ह्या आठवड्यात आपली इच्छापूर्ती होऊ शकते. ह्या आठवड्यात आपली पदोन्नती आणि धनलाभ संभवत आहे. वरिष्ठांशी आपला संपर्क वाढेल. अतिरिक्त प्राप्तीचे स्रोत निर्माण होऊन संचित धनाची वृद्धी होईल. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना उच्च पद प्राप्तीची संधी मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या संपर्कात आपण याल, ज्याच्या सहकार्याने आपणास धनलाभ आणि प्रगतीच्या मार्गात मदत होईल. प्रकृती सामान्यच राहील. परंतु आपणास कुटुंबातील एखाद्या वयोवृद्धाच्या प्रकृतीची थोडी काळजी वाटू शकते. प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात सुद्धा होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखद होईल.
कन्या (Virgo) : ह्या आठवड्यात आपणास आपल्या कार्यक्षेत्री सतर्क राहावं लागेल. मोठी कारकीर्द किंवा मोठ्या व्यवसायासंबंधित कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. आपणास जर निर्णय घेणे जमत नसेल तर एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा किंवा निर्णय पुढे ढकलावा. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या प्राप्तीचे प्रमाण कमी होऊ शकते, तर खर्च वाढू शकतात. त्यामुळं आपले अंदाजपत्र कोलमडू शकते. प्रकृती काहीशी नरमच राहील. ऋतुजन्य विकार किंवा जुनाट आजारांचा त्रास संभवतो. विद्यार्थ्यांचे अभ्यासावरील लक्ष विचलित होऊ शकते. व्यावसायिकांनी कोणत्याही नवीन योजनेत आर्थिक गुंतवणूक करताना सतर्क राहावे. कठीण प्रसंगी आपले प्रेमसंबंध सहाय्यक होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल.
तूळ (Libra) : हा आठवडा आपल्यासाठी सुख-समृद्धी घेऊन येत आहे. आठवड्याच्या सुरूवातीस सुख-सुविधांशी संबंधित वस्तूंच्या खरेदीमुळं आपल्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आपण जर दीर्घ काळापासून आपल्या बदलीची किंवा पदोन्नतीची प्रतीक्षा करत असाल तर ह्या आठवड्यात आपली हि इच्छा पूर्ण होऊ शकते. असं असलं तरी आपल्या प्राप्तीच्या साधनात जशी वाढ होईल तशीच वाढ खर्चात सुद्धा होईल. व्यवसायातील अनपेक्षित लाभ आपल्या आनंदात भर घालेल. आठवड्याच्या उत्तरार्धात मित्रांच्या सहकार्याने आपण एखादे मोठे कार्य पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. प्रणयी जीवनात प्रेमिकेशी आपली जवळीक वाढेल. कुटुंबीय आपल्या प्रेम विवाहास मंजुरी देऊ शकतात. दांपत्य जीवन सुखद होईल. जोडीदाराच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी आपणास मिळेल. ह्या दरम्यान जोडीदारास मिळालेली एखादी सिद्धता आपल्या आणि कुटुंबाच्या आनंदात महत्वाची कामगिरी बजावेल.