- मेष Aries: आठवड्याची सुरूवात जीवनातील एखादी मोठी अडचण दूर होण्याने होईल. आपणास वरिष्ठ व कनिष्ठ असे दोघांचेही सहकार्य मिळेल. ज्या व्यक्ती आजारी आहेत, त्यांचा आजार बरा होईल. हा आठवडा परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूल व यशदायी असणार आहे. व्यापाऱ्यांना आठवड्याच्या सुरूवातीस अपेक्षित लाभ मिळेल. आठवड्याच्या अखेरपर्यंत एखादी चांगली बातमी मिळेल. युवकांचा बहुतांश वेळ मौज-मजा करण्यात व्यतीत होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात कारकिर्दीत व व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी प्राप्त होईल. दांपत्य जीवनातील सौख्य टिकून राहील. प्रणयी जीवन प्रगल्भ होईल. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवाल.
- वृषभ Taurus: ह्या आठवड्यात विनाकारण होणाऱ्या वादा पासून दूर राहावे लागेल. आठवड्याच्या सुरूवातीस कार्यक्षेत्री आपले विरोधक सक्रिय होऊन आपल्या ध्येयापासून आपणास विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात. अतिरिक्त परिश्रम आणि प्रयत्न सुद्धा करावे लागतील. प्रणयी जीवनात गैरसमज होण्याची संभावना आहे, जे दूर करण्यासाठी वाद घालण्याऐवजी संवाद साधावा. अन्यथा संबंध बिघडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास घर दुरुस्तीत किंवा आवश्यक वस्तूंच्या खरेदीत जास्त पैसे खर्च होऊ शकतात. जमीन-जुमल्याशी संबंधित वाद इत्यादी कोर्ट-कचेरीच्या बाहेर सोडवणे हितावह होईल. व्यापाऱ्यांना आर्थिक देवाण-घेवाण करताना खूप सावध राहावं लागेल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. उत्तरार्धात ऋतुजन्य विकार होण्याची संभावना आहे.
- मिथुन Gemini : हा आठवडा आपणास सुख-समृद्धी आणि यश देणारा आहे. आठवड्याच्या सुरूवातीस परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. आपण जर अनेक दिवसांपासून आवडत्या जागेवर बदलीच्या किंवा पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असाल तर ह्या आठवड्यात आपली ती इच्छा पूर्ण होईल. बेरोजगारांना रोजगाराची उत्तम संधी मिळेल. कामाबरोबरच आहारावर विशेष लक्ष द्यावं, अन्यथा पोटाशी संबंधित विकार होऊ शकतात. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीनं पैतृक संपत्तीशी संबंधित वादाचं निराकरण झाल्यानं आपण आनंदित व्हाल. सुखी वैवाहिक जीवनासाठी आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्यासाठी थोडा वेळ अवश्य काढा. प्रणयी जीवनातील गैरसमज एखाद्या स्त्री मित्राच्या मदतीनं दूर होतील.
- कर्क Cancer : आठवड्याच्या सुरूवातीस कार्यक्षेत्री एखाद्या गोष्टीमुळं सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. ह्या आठवड्यात आपणास आपलं मन, वाणी आणि व्यवहार नियंत्रित ठेवावं लागतील, अन्यथा आपणास निष्कारण अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ज्या व्यक्ती नोकरीत बदल करण्याच्या विचारात आहेत त्यांना सुद्धा ह्या आठवड्यात चांगल्या संधी प्राप्त होण्याची संभावना आहे. सत्ता आणि शासनाशी संबंधित कोणत्याही बाबींचे निराकरण करताना आपली वाणी आणि व्यवहार नियंत्रित ठेवा. आठवड्याच्या उत्तरार्धात कामानिमित्त दूरवरचे किंवा जवळचे प्रवास संभवतात. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो. त्यांचे लक्ष मौज-मजा करण्यावर असेल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. प्रेमिकेचा दुरावा किंवा तिची भेट न झाल्यानं मन व्यथित होईल.
- सिंह Leo: हा आठवडा आपणास यश व सौभाग्य देणारा आहे. आठ्वड्याच्या सुरवातीस कारकिर्दीसाठी व व्यवसायासाठी केलेले प्रवास अपेक्षित यश देणारे आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीचे नवीन स्रोत उपब्ध होतील. समाजात मान-सन्मान उंचावेल. बाजारातील थकबाकी मिळेल. व्यापारवृद्धीची इच्छा पूर्ण होईल. एखाद्या वरिष्ठ किंवा प्रतिष्ठित व्यक्तीशी झालेली ओळख भविष्यात लाभास कारणीभूत होईल. युवकांचा बहुतांश वेळ मौज-मजा करण्यात जाईल. जमीन-घर इत्यादीच्या खरेदी-विक्रीची कामना पूर्ण होईल. ह्या आठवड्यात मुलांशी संबंधित एखादे मोठे यश आपला आनंद व सन्मान वाढवणारे होईल. प्रणयी जीवन प्रगल्भ होईल. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवाल. दांपत्य जीवन सुद्धा सुखद होईल. जोडीदाराकडून एखादी मोठी भेटवस्तू मिळू शकते. प्रकृती सामान्यच राहील.
- कन्या Virgo : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठ्वड्याच्या सुरूवातीस कार्यक्षेत्राशी संबंधित काही समस्या आपल्या काळजीस कारणीभूत होऊ शकतात. आपल्या ध्येयपूर्तीसाठी अतिरिक्त परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना अजून प्रतीक्षा करावी लागू शकते. आठवड्याच्या मध्यास आपणास आपल्या प्रकृतीवर व संबंधांवर विशेष लक्ष द्यावं लागेल. आपले आर्थिक नुकसान संभवते. ह्या दरम्यान जमीन-घर इत्यादीशी संबंधितबाबी आपल्या काळजीस कारणीभूत होऊ शकतात. कठीण प्रसंगात आपला वैवाहिक जोडीदार आपल्या पाठीशी सावली प्रमाणे उभा राहील. ह्या आठवड्यात व्यक्तिगत जीवनात किंवा प्रणयी जीवनात येणाऱ्या समस्यांकडं दुर्लक्ष न करता त्यांना सामोरे जाणे किंवा त्यांचे निराकारण करणं हितावह होईल. प्रेमिकेचा झालेला गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधावा.
- तूळ Libra: ह्या आठवड्याच्या सुरवातीस कारकिर्दीशी किंवा व्यवसायाशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात. कामाचा भार सुद्धा जास्तच असेल. कार्यक्षेत्राशी संबंधित ह्या समस्या असताना कुटुंबातील वातावरण सुद्धा एखाद्या गोष्टीने तणावाचे राहील. वैवाहिक जोडीदाराशी झालेल्या वादामुळं आपलं मन खिन्न होऊ शकते. आपणास पुन्हा एकदा नशीबची साथ मिळू लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यावसायिक भागीदारीत असणाऱ्या व्यक्तींना अपेक्षित लाभ मिळेल. ज्या व्यक्ती आपल्या व्यवसाय वृद्धीचा विचार करत असतील त्यांची कामना पूर्ण होईल. एखादा मोठा निर्णय घेताना आपणास आपल्या भावंडांसह कुटुंबियांचे समर्थन मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी धार्मिक यात्रा संभवते. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. आपल्यात उत्तम समन्वय साधला जाईल.
- वृश्चिक Scorpio : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. समस्यांना घाबरून पळून न जाता त्यांना सामोरे जाणे हितावह होईल. विशेष म्हणजे आव्हाने कार्यक्षेत्राशी संबंधित असोत किंवा आपल्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित असोत, आपण आपल्या बुद्धीचा आणि विवेकाचा वापर करून ती परतवून लावण्यात यशस्वी व्हाल. ज्या व्यक्ती परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करण्यात गुंतले असतील त्यांना यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावें लागतील. आठवड्याच्या मध्यास आपले गुप्त शत्रू सक्रिय होण्याची शक्यता असल्यानं आपणास खूप सावध राहावं लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात कामा निमित्त दूरवरचे किंवा जवळचे प्रवास संभवतात. ह्या दरम्यान आर्थिक देवाण-घेवाण करताना सावध राहावे, अन्यथा आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. लटक्या भांडणासह प्रणयी जीवन सामान्यच राहील. वैवाहिक जीवन सुखद होईल.
- धनु Sagittarius: ह्या आठवड्याची आपली सुरूवात दूरवरच्या किंवा जवळच्या प्रवासाने होईल. हा प्रवास सुखद व मनोरंजनात्मक होईल. आठवड्याच्या सुरूवातीस अपेक्षित पद प्राप्ती होऊ शकते. आपण जर अनेक दिवसांपासून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा किंवा असलेल्या व्यवसायाची वृद्धी करण्याचा विचार करत असाल तर ह्या आठवड्यात आपली हि कामना पूर्ण होऊ शकते. आपला मान-सन्मान उंचावेल. ह्या दरम्यान मुलांकडून सुद्धा एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात स्वजनांशी झालेले गैरसमज दूर होऊन आत्मीय प्रेम वृद्धिंगत होईल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा हा आठवडा आपणास अनुकूल आहे. कुटुंबीय आपल्या प्रेम विवाहावर शिक्कमोर्तब करू शकतात. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल.
- मकर Capricorn: ह्या आठवड्यात इकड-तिकडच्या गोष्टींवर लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आपण जर आपल्या जीवनाशी संबंधित समस्यांचे मन शांत ठेवून निराकरण करण्याचा प्रयत्न केलात तर आपण त्यात नक्कीच यशस्वी व्हाल. कोणत्याही योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ञ व्यक्तीचा किंवा शुभचिंतकाचा सल्ला घेण्यास विसरू नका. ह्या दरम्यान घराच्या दुरुस्तीसाठी किंवा आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जास्त पैसा खर्च करावा लागू शकतो आणि त्यामुळं आपले अंदाजपत्र कोलमडू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी करणाऱ्या महिलांना समतोल साधण्यात काही समस्या येऊ शकतात. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांनी समाज माध्यम इत्यादींवर आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करणं टाळावे.
- कुंभ Aquarius : हा आठवडा आपल्या कारकिर्दीच्या आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. आपण जर अनेक दिवसांपासून व्यवसायवृद्धीचा विचार करत असाल तर आपल्या मित्रांच्या मदतीने आपली हि कामना पूर्ण होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत प्राप्त होतील. परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. आठवड्याच्या मध्यास जमीन किंवा घर ह्यांच्या खरेदी-विक्रीसाठी माता-पित्यांचे पूर्ण सहकार्य व समर्थन मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी सुद्धा अनुकूल आहे. आपण जर एखाद्या व्यक्ती समोर आपल्या प्रेमाची कबुली दिलीत तर त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तसेच जे पूर्वी पासून प्रेमात आहेत त्यांच्या प्रेम विवाहास कुटुंबिय मान्यता देऊ शकतात.
- मीन Pisces: हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी व यशदायी आहे. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना चांगली संधी मिळेल. सत्ता आणि शासनाशी संबंधित योजनांचा लाभ मिळेल. आपण जर परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा किंवा नोकरी करण्याचा विचार करत असाल तर कदाचित ह्या आठवड्यात आपली मनोकामना पूर्ण होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात जमीन-जुमला किंवा पैतृक संपत्तीशी संबंधित वाद किंवा अडथळे दूर होतील. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी मात्र घ्यावीच लागेल. अन्यथा ऋतुजन्य विकार होण्याची संभावना आहे. कोर्ट-कचेरीशी संबंधित बाबीत निर्णय आपल्या बाजूने लागेल. व्यवसायात अपेक्षित लाभ व प्रगती होत असल्याचं दिसून येईल. ह्या आठवड्यात आपले प्रणयी जीवन अत्यंत सुखद होईल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन सुद्धा सुखद होईल.
हेही वाचा -