महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा; नवीन संधीचे द्वारे उघडणारा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope - WEEKLY HOROSCOPE

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope 2024
साप्ताहिक राशीभविष्य 2024 (संग्रहित छायाचित्र)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2024, 3:06 AM IST

मेष (Aries): या आठवड्यात आपणास अत्यंत सतर्क राहावं लागेल. कार्यक्षेत्री आपल्या कामात ज्या व्यक्ती खोडा घालण्याचा प्रयत्न करू शकतात, त्या व्यक्तींपासून आपणास सावध राहावे लागेल. विवादापासून दूर राहणं आपल्या हिताचं होईल. व्यापारातील देवाण - घेवाण करताना सावध राहावं, अन्यथा आपणास आर्थिक नुकसान सोसावं लागू शकतं. आठवड्याच्या मध्यास घरगुती चिंता सतावू शकतात. ह्या व्यतिरिक्त आपणास आपले आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. प्रेम संबंधात सामंजस्य दाखवावे. आपल्या प्रेमिकेच्या भावनांकडं लक्ष द्यावं. दांपत्य जीवनात जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल. अचानकपणे उदभवलेला आरोग्यविषयक त्रास आपणास रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडू शकतो. ह्या आठवड्यात कामानिमित्त प्रवास करावे लागू शकतात, ज्यात आपली दमछाक होऊ शकते.

वृषभ (Taurus) : या आठवड्यात आपणास कामे करण्यासाठी इतरांशी मिळून-मिसळून राहावं लागेल, मग ते घरातले असो किंवा कार्यालयीन. आपणास जर नोकरीत बदल करावयाचा असेल तर आपणास आपल्या परिस्थितीचा अभ्यास करून विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल. एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपलं प्रियजन किंवा तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरेल. आपणास घाई-घाईत किंवा भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय न घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्रणयी जीवनातील गैरसमज वाद घालून सोडविण्या ऐवजी संवादाने सोडविण्याचा प्रयत्न करावा. एखादी दुखापत होण्याची शक्यता असल्यानं वाहन चालवताना आपणास सतर्क राहावे लागेल. दांपत्य जीवन सुखद होईल. आपला जोडीदार आपल्या पाठीशी राहील. आठवड्याच्या अखेरीस आपणास मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते.

मिथुन (Gemini): हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत आव्हानात्मक असण्याची संभावना आहे. आठवड्याच्या सुरूवातीस आपणास कारकिर्द किंवा व्यावसायिक क्षेत्रात प्रवास करावं लागू शकतात, ज्यात आपणास थकवा जाणवण्याची संभावना आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी त्यांची मेहनत वाढवावी लागेल. नोकरी करणाऱ्या महिलांना कार्यालय व घर ह्यात समतोल साधण्यात काही अडथळे येऊ शकतात. आठवड्याच्या मध्यास सुख-सुविधेसाठी आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. त्यामुळं आपलं अंदाजपत्रक कोलमडू शकतं. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ मिळू शकेल. आपण जर आपल्या व्यापाराचा विस्तार करू इच्छित असाल तर त्यासाठी आपणास एखाद्या विशेष व्यक्तीचं किंवा मित्राचं सहकार्य मिळेल. प्रेम संबंध दृढ होतील. आपल्या प्रेमिकेचे प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत होईल. वैवाहिक जीवन सुखद होईल.

कर्क (Cancer) : या आठवड्यात आपणास भरपूर मेहनत करावी लागेल. आळस आणि इतरांवर अवलंबून राहण्याची वृत्ती सोडावी लागेल. आपण जर एखाद्या मोठ्या प्रकल्पावर कार्य करत असाल तर वेळेवर त्याची पूर्तता होण्यासाठी आपणास जास्त मेहनत करावी लागेल. या दरम्यान आपल्या प्राप्तीच्या साधनांवर काही प्रतिबंध लागू शकतात. व्यवसायात आपणास आपल्या स्पर्धकांचा तगडा मुकाबला करावा लागू शकतो. आपण जर प्रवास करत असाल तर त्या दरम्यान आपणास आपल्या प्रकृतीची आणि सामानाची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या अखेरीस आपणास आपल्या वाणीवर आणि वर्तनावर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा आपल्या प्रेमिकेशी वाद होऊ शकतो. आठवड्याच्या अखेरीस कुटुंबियांसह एखादा धार्मिक प्रवास किंवा एखादी सहल होण्याची संभावना आहे. आपणास आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा पोटाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे.

सिंह (Leo) : हा आठवडा आपल्यासाठी आनंददायी असण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरूवातीस घरात धार्मिक कार्य होऊ शकतात. आपण एखादा प्रवास सुद्धा करू शकता, मग तो जवळचा असो किंवा दूरवरचा. आपणास शासनाशी संबंधित एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीनं लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आपण जर अनेक दिवसांपासून घर किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असलात तर ह्या आठवड्यात आपली स्वप्नपूर्ती होऊ शकते. त्यातून आपणास अपेक्षित लाभ सुद्धा होऊ शकतो. जर आपल्या प्रणयी जीवनात एखादी समस्या असेल तर ती मित्राच्या मदतीनं दूर होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखद होईल. मुलासंबंधी एखादी मोठी चिंता दूर झाल्यानं आपल्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आपली प्रकृती सामान्यच राहील.

कन्या (Virgo) :हा आठवडा आपल्यासाठी नवीन संधीचे द्वारे उघडणारा आहे. कारकिर्दीत व व्यवसायात प्रगती करण्यासाठी अपेक्षित प्रस्ताव आपल्या समोर येऊ शकतात. आठवड्याच्या सुरूवातीपासूनच आपली कामे वेळेवर पूर्ण झाल्यानं आपल्यात उत्साह व पराक्रमाची भावना जागरूक होईल. आठवड्याच्या मध्यास एखाद्या विशेष व्यक्तीच्या मदतीनं व्यवसाय वृद्धीची योजना तयार होऊ शकते. व्यवसायानिमित्त आपणास प्रवास करावे लागू शकतात, मग ते जवळचे असोत किंवा दूरवरचे. प्रवास सुखद व लाभदायी होतील. दांपत्य जीवन सुखद होईल. भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. प्रणयी जीवनात उत्तम समन्वय असल्याचं दिसून येईल. आपली प्रकृती सामान्यच राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास धार्मिक गोष्टींची गोडी लागेल. कुटुंबियांसह आपण एखादी तीर्थयात्रा करू शकता.

तूळ (Libra) : हा आठवडा आपल्यासाठी सौख्यदायी आणि सौभाग्यदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस कामाच्या ठिकाणी मोठी प्रगती होऊ शकते. एखाद्या मित्राच्या मदतीनं आपणास मोठ्या योजनेवर काम करण्याची संधी मिळू शकते. आपणास जर अपेक्षित ठिकाणी बदली किंवा पदोन्नती मिळाली तर घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. ह्या आठवड्यात आपण सुख-सुविधांशी संबंधित वस्तूंवर पैसे खर्च करू शकता. युवकांचा अधिकांश वेळ मस्ती आणि आनंदात जाईल. आठवड्याच्या मध्यास आपलं मन धार्मिक व सामाजिक कार्यात गुंतले जाऊन आपण त्यात जास्त सक्रिय व्हाल. समाजात आपली प्रतिष्ठा उंचावेल. ह्या दरम्यान आपणास व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. पूर्वीपासून असलेल्या आर्थिक समस्यांचं निराकरण आपण यशस्वीपणे कराल. आठवड्याच्या अखेरीस आपण आपले मित्र किंवा कुटुंबियांसह एखाद्या सहलीचं आयोजन करू शकाल. प्रेमासंबंधात वृद्धी होईल. दांपत्य जीवन सुखद होईल. आपली प्रकृती सामान्यच राहील.

वृश्चिक (Scorpio) :हा आठवडा आपल्या जीवनात एखादे महत्वाचे परिवर्तन आणि अडचणीसमोर आव्हानांचा सामना घडवून आणणारा आहे. अशा परिस्थितीत आपण घाबरून न जाता त्यास एका संधीच्या नजरेने बघावे. आपणास आपला अहंकार सोडून इतरांशी सहकार्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आठवड्याच्या मध्यास अचानकपणे आपणास घर दुरुस्ती करण्यात जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. परीक्षा व स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्तीसाठी जास्त मेहनत करावी लागेल. प्रेम संबंधात सतर्क राहा. आपल्या प्रेमाचं प्रदर्शन लोकासमोर करू नका, अन्यथा आपणास काही त्रास होऊ शकतो. दांपत्य जीवन सुखद होईल. असं असलं तरी, कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीच्याबाबतीत आपलं मन चिंतीत होऊ शकते. त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

धनु (Sagittarius) : हा आठवडा आपल्यासाठी विविध संधी आणि आव्हानांसह मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं काही साध्य केल्यानं आपला मान-सन्मान वाढेल. घरात धार्मिक, मांगलिक कार्ये होतील. आपणास एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीनं जमीन-जुमल्याशी संबंधित वादात समाधान लाभेल. व्यवसाय वृद्धीसाठी मित्र व कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. आठवड्याच्या मध्यास कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीमुळं आपलं मन चिंताग्रस्त होईल. त्याचबरोबर आपली प्राप्ती कमी होऊन खर्च वाढू शकतात. त्यामुळं आपलं अंदाजपत्र अस्थिर होऊ शकते. प्रेमासंबंधात काही अडथळे येऊ शकतात. प्रेमिकेची भेट न झाल्यानं आपलं मन बेचैन होईल. वैवाहिक जीवन सामान्य राहिले तरी कडू-गोड वाद होऊ शकतात. प्रकृतीकडं दुर्लक्ष करू नये. रुग्णालयात दाखल होण्याकडं दुर्लक्ष करू नये.

मकर (Capricorn) : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आपले मन एखादा घरगुती वाद किंवा कार्यक्षेत्राशी संबंधित जवाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करण्याच्या बाबतीत त्रासून जाईल. त्यामुळं आपल्या कामात चुका सुद्धा होऊ शकतात. अशावेळी आपली वाणी व वागणूक पूर्णतः नियंत्रणात ठेवावी लागेल. आठवड्याच्या मध्यास आपणास कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. आपणास आर्थिक देवाण-घेवाण करताना सावध राहावं लागेल. वायफळ खर्च टाळावे लागतील. आठवड्याच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात दिलासाजनक स्थिती निर्माण होऊ शकते. ह्या दरम्यान एखाद्या मित्राच्या मदतीनं आपण गैरसमजातून बाहेर पडून आपल्या कार्यक्षेत्री योग्य निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा मिश्र फलदायी आहे. प्रेमिकेशी थोडे वाद झाले तरी प्रेम टिकून राहील. वैवाहिक जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल. प्रकृतीकडं लक्ष द्यावं, तसेच आपल्या दिनचर्येचे योग्य पालन करावे.

कुंभ (Aquarius) : हा आठवडा आपल्यासाठी काहीसा मिश्र फलदायी आहे. कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी किंवा ते वेळेवर पूर्ण करण्यासाठी आपणास जास्तीचे परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. आठवड्याच्या सुरूवातीस आपल्या कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात मध्यम स्तरावरील प्रगती होताना दिसेल. आठवड्याच्या मध्यास एखाद्या घरगुती चिंतेने आपलं मन काहीसे त्रस्त होईल, परंतु आठवडा अखेर पर्यंत त्यातून बाहेर पडण्यात आपण यशस्वी व्हाल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी आपली ओळख होईल, ज्याच्या मदतीनं आपण भविष्यात लाभदायी योजनेत सहभागी होऊ शकाल. ह्या दरम्यान परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित लाभ होऊ शकतो. आठवड्याच्या सुरूवातीस प्रेमिकेस भेटण्यात अडचणी येतील, ज्यामुळं आपलं मन काहीसे खिन्न होईल. असं असलं तरी आठवड्याचा उत्तरार्ध आपल्यासाठी शुभ फलदायी असून आपण तिच्या सहवासात हसत-खेळत जास्त वेळ घालवू शकाल. दांपत्य जीवन सुखद होईल.

मीन (Pisces) : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. आठवड्याच्या सुरूवातीस रोजंदारीच्या आड येणारी मोठी अडचण दूर झाल्यानं आपण मोकळा श्वास घेऊ शकाल. ह्या दरम्यान व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. आपण व्यवसाय विस्ताराची योजना तयार कराल. सुख-सोयींसाठी लागणाऱ्या वस्तूंवर आपणास पैसा खर्च करावा लागेल. जमीन-जुमल्याशी संबंधित वादांचं निराकरण होईल. जर कोर्टात एखादा खटला चालू असेल तर निर्णय आपल्या बाजूने लागू शकतो. ज्या व्यक्ती परदेशात आपली कारकीर्द घडवू इच्छितात त्यांची इच्छापूर्ती ह्या आठवड्यात होऊ शकते. नोकरी करणाऱ्या महिलांना विशेष लाभ मिळेल. ह्या आठवड्यात एखाद्या व्यक्तीची झालेली भेट प्रथम मैत्रीत आणि नंतर प्रेमात परिवर्तित होऊ शकते. पूर्वीपासून प्रेमात असलेल्या व्यक्तींमध्ये उत्तम समन्वय असल्याचं दिसून येईल. लोक आपल्या जोडीचे कौतुक करतील. दांपत्य जीवन सुखद होईल. आपण आपल्या जोडीदाराच्या सहवासात हसत - खेळत वेळ घालवू शकाल. प्रकृती सामान्यच राहील.

हेही वाचा -

पुणे जिल्ह्यात भुलेश्वर मंदिरात श्रीगणेशाचे स्त्री रूप दर्शन - Ganeshwari in Bhuleshwar Temple

गणेशोत्सव २०२४ : पिंपळाच्या खोडात "सृष्टीविनायक"; अमरावतीच्या श्रीकृष्ण पेठेत गणरायाचं अनोखं रूप - Srishtivinayak

ABOUT THE AUTHOR

...view details