मेष (ARIES) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम उत्साह आणि आवेश यांनी पूर्णतः भरलेले असल्याचा अनुभव आपणास येईल. शरीर, मन स्फूर्ती आणी टवटवीतपणाने भरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मित्रासह आनंदात वेळ घालवाल. आईकडून लाभ होईल. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ, रुचकर भोजन आणि भेटवस्तू मिळाल्यानं आपला आनंद वाढेल.
वृषभ (TAURUS) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज राग आणि निराशेची भावना मनात पसरेल. प्रकृती साथ देणार नाही. घर - परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. परिश्रम वाया जात आहेत असे वाटेल. गैरसमजापासून जपून राहावे.
मिथुन (GEMINI) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात असेल. आज कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. नोकरी-व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. उच्च पदाधिकारी आपल्या कामाची प्रशंसा करतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. स्त्री स्नेह्यांकडून विशेष लाभ होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनात माधुर्याचा आनंद घ्याल. संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील.
कर्क (CANCER) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात असेल. आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आई तसेच इतर कुटुंबीय ह्यांच्याशी सौहार्दाचे संबंध राहतील. मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्यानं आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. सरकारी कामात अनुकूलता लाभेल.
सिंह (LEO) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात असेल. आज आळस, थकवा आपल्या कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारीमुळं अस्वस्थता अनुभवाल. नोकरी-व्यवसायाच्या प्रगतीत अडथळा येईल. वरिष्ठांशी मतभेद होतील. रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मांगलिक कार्य किंवा प्रवासामुळं मनाची अशांती दूर होईल.
कन्या (VIRGO) :आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात असेल. आज मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळं मतभेद होण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. नवीन कार्यारंभ लांबणीवर टाका. पाण्यापासून दूर राहा. खर्च खूप होईल. गूढ विद्या आणि रहस्य ह्यांची गोडी लागेल.
तूळ (LIBRA) :आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आज दैनंदिन कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून आपण मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटन ह्यांची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. भिन्नालिंगी किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळं आपणास खूप आनंद होईल. नवीन वस्त्रालंकारांची खरेदी किंवा परिधान करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक मान - सन्मान प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदाराच्या प्रेमाची उब आणि सहवास यामुळं आपण आनंदित व्हाल.