महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' राशीच्या जोडप्यांनी स्पेशल साजरा करावा 'हग डे', वाचा राशीभविष्य - हग डे

Today Horoscope : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 12 फेब्रुवारी 2024 चे राशी भविष्यात.

Today Horoscope
राशीभविष्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 5:11 AM IST

मेष :आज चंद्र कुंभ राशीत आहे. आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीनं विवाहेच्छुकांना यश मिळेल. दुपार नंतर मात्र प्रकृती बिघडू शकते. आज गुंतवणूक करताना खूप विचार करावा लागेल. कौटुंबिक विरोध संभवतो. सबब मौन पाळणे सर्वोत्तम. इतरांच्या समस्या सोडविण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःच अडकून पडण्याची शक्यता आहे. अपघाताच्या शक्यतेमुळं वाहन चालवताना काळजी घ्यावी.

वृषभ : आपल्या राशी पासून चंद्र दशम असेल. आज सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्तता मिळू शकेल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधान लाभेल. व्यापार - व्यवसायात यश मिळवू शकाल. आपल्या कामगिरीचं कौतुक होऊन वरिष्ठ आपणांवर खुश होतील. दुपार नंतर नवीन कामाचं यशस्वी नियोजन करू शकाल. व्यापारात फायदा होईल. पत्नी आणि संततीकडून लाभ होईल. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल.

मिथुन : आपल्या राशी पासून चंद्र भाग्य असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृतीत चढ-उतार येतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाखूष झाल्यानं आपणास मानसिक त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. दुपार नंतर कार्यातील यश दृष्टिक्षेपात आल्याने मनाला आनंद वाटेल. व्यापारातील वातावरण आपणास अनुकूल होईल. वडीलधार्यांच्या आशीर्वादाने तुमचे कार्य तडीला जाईल. नोकरीत बढती संभवते. धन मिळेल.

कर्क : आपल्या राशी पासून चंद्र अष्टम असेल. आज मन अशांत आणि निरुत्साही राहील. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. अवैध कृत्ये आणि नकारात्मक विचारां पासून दूर राहावं लागेल. पैशांची चणचण भासेल. दुपार नंतर मात्र प्रकृती चांगली राहिल्याने मनःस्वास्थ्य मिळेल. आनंदप्राप्तीसाठी खर्च होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतात. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. एखाद्याशी वाद आणि मतभेद होण्याची शक्यता आहे.

सिंह :आपल्या राशी पासून चंद्र सातव्या असेल. आज आपणास मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील. मित्र आणि स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीस जाऊ शकाल. दुपार नंतर मात्र अती विचार केल्यामुळं मानसिक थकवा जाणवेल. संतापामुळं कार्ये बिघडतील, पण बोलण्यावर संयम ठेवून परिस्थिति हाताळू शकाल. पैशाची चणचण भासेल.

कन्या : आपल्या राशी पासून चंद्र सहाव्या असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश आणि प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळं शारीरिक आणि मानसिक दृष्टया आपण तरतरीत आणि प्रफुल्लित राहाल. भावनेच्या भरात आपण वाहवत जाण्याची शक्यता आहे. दुपार नंतर दिवस आनंदात जाईल. व्यापारात भागीदारांकडून लाभ होतील.

तूळ : आपल्या राशी पासून चंद्र पाचव्या असेल. लेखनकार्य करण्यास आजचा दिवस शुभ आहे. बौद्धिक चर्चेतून लाभ संभवतात. कीर्ती वाढेल. आज जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

वृश्चिक : आपल्या राशी पासून चंद्र चवथ्या असेल. आज हट्ट सोडणे हितावह राहील. आज आपण भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. वैभवी वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल. माते कडून लाभ होईल. दुपार नंतर विचारात एकदम बदल होईल. नवीन कामात अडचणी येतील. बौद्धिक आणि तार्किक कामे करू शकाल. पोटाच्या तक्रारी संभवतात. प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे.

धनू :आपल्या राशी पासून चंद्र तिसऱ्या असेल. आज मन उत्साहित राहील. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्य निर्णय घेऊ शकाल. मित्रांशी संबंध वाढतील आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल. दुपार नंतर मात्र आपण अधिक संवेदनशील व्हाल. मानसिक ताण राहील. स्त्री वर्गाचा प्रसाधनांवर खर्च होईल. घर, जमीन, वाहन इत्यादींच्या व्यवहारात फसवणूक संभवते. विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्तीच्या दृष्टिने आजचा दिवस अनुकूल आहे.

मकर: आपल्या राशी पासून चंद्र दुसऱ्या असेल. आज एखाद्या मंगल कार्यासाठी आपणास खर्च करावा लागेल. वाद-विवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांचे मन दुखावेल आणि ते आपल्यावर नाराज होतील. दुपार नंतर मनातील चिंता दूर होतील. मित्र भेटीने मन आनंदी होईल. नशिबाची साथ लाभेल. भावंडांच्या प्रेमाचा आपल्यावर वर्षाव होईल.

कुंभ : आपल्या राशी पासून चंद्र प्रथम असेल. आज प्रापंचिक गोष्टीं ऐवजी गूढ विषयांकडे आपला जास्त कल होईल. नकारात्मक विचार काढून मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील. दुपार नंतर एखाद्या धार्मिक कार्याकडे आकर्षित व्हाल. विद्यार्थ्यांना लेखन- वाचनात अनुकूलता लाभेल. वैवाहिक जीवन शांततामय असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मीन : आपल्या राशी पासून चंद्र बाराव्या असेल. आज आर्थिक देवाण- घेवाण, वसुली, थकबाकी इत्यादी कार्यात आणि गुंतवणूक करताना सावध राहावं लागेल. इतरांच्या कामांत व्यत्यय आणू नका. कोर्ट- कचेरी प्रकरणात सावध राहावं लागेल. वाणी आणि संतापावर नियंत्रण ठेवावं लागेल. एखादा अपघात संभवतो. दुपार नंतर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारेल. धार्मिक आणि परोपकारी कार्यात मन गुंतेल. मित्रांकडून भेट वस्तू मिळतील. घरगुती वातावरण आनंदाचे राहील.

हेही वाचा -

  1. 'या' राशीच्या व्यक्तींना मिळेल जोडीदाराकडून खास 'प्रॉमिस'; वाचा राशीभविष्य
  2. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग

ABOUT THE AUTHOR

...view details