मेष (ARIES): आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. कार्यालयीन किंवा व्यापारी क्षेत्रातील अधिकारी वर्गाशी महत्वाची चर्चा होईल. सरकारी फायदा मिळण्याची शक्यता आहे. कामासाठी एखादा प्रवास घडेल. काम वाढेल. शारीरिक थकवा जाणवेल. आईकडून लाभ संभवतो.
वृषभ (TAURUS) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील आणि भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास घडतील. एखाद्या प्रवासाने मन प्रसन्न झाले तरी सुद्धा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कामाचा व्याप वाढेल.
मिथुन (GEMINI): आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन कार्य किंवा औषधोपचार आज सुरू करू नये. रागावम संयम ठेवला नाही तर एखाद्या अप्रिय प्रसंगास सामोरे जावे लागेल. खर्च जास्त झाल्याने आर्थिक चणचण भासेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा.
कर्क (CANCER) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. समृद्ध जीवनशैली आणि मनोरंजक वृत्तीमुळं आज आपण आनंदी राहाल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. मान-प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखू शकाल.
सिंह (LEO): आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी बोलताना वाणीवर संयम ठेवावा. दैनंदिन कामात विघ्ने येतील. कार्यपूर्तीत अडचणी येतील. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी झाल्यानं नैराश्य येईल. आई विषयक चिंता राहील.
कन्या (VIRGO) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. आज शक्यतो वाद आणि चर्चा ह्यापासून दूर राहणे हितावह राहील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडचणी येतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्यानं मन आनंदित होईल. पोटाच्या तक्रारी वाढू शकतील. शेअर्स, सट्टे बाजारात गुंतवणूक करताना सावध राहावे.
तूळ (LIBRA) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात हळवेपणा जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव जाणवेल. मानसिक तणाव सुद्धा असेल. धनाची तसेच कीर्तीची हानी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी राहील. जवळच्या नातलगांशी संघर्ष किंवा वाद झाल्याने मनाला यातना होतील.