मेष (ARIES): चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर नवीन कार्यारंभ करण्यात अडचणी येतील. आपल्या कृती संयमित ठेवणं हितावह राहील. राग, द्वेष यांपासून दूर राहावं लागेल. शत्रूंचा उपद्रव वाढेल. तब्बेतीकडं लक्ष द्यावं लागेल. गूढ विद्येत आवड निर्माण होईल.
वृषभ (TAURUS) :चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. व्यापार-व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल. दुपारनंतर चांगले मनोरंजन होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल. वस्त्र व गृहोपयोगी वस्तू ह्यांच्या खरेदीवर खर्च होईल. सामाजिक मान- सम्मान होतील.
मिथुन (GEMINI) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा करण्यात जाईल. आपल्या कल्पनाशक्तिस वाव मिळेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यास मात्र जपावे लागेल. दुपारनंतर व्यवसायात लाभ संभवतो. कुटुंबात शांतता नांदेल.
कर्क (CANCER) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज शारीरिक, मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात त्रास संभवतो. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. शांतता लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. शारीरिक उत्साह वाढेल. अती विचाराने मन विचलित होण्याची शक्यता आहे.
सिंह (LEO) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ संभवतो. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. दुपारनंतर आपली सहनशीलता दिसून येईल. नैराश्य येण्याची शक्यता आहे. आरोग्य नरम गरम राहील. कौटुंबिक किंवा संपत्ती संबंधी एखादी समस्या उदभवेल.
कन्या (VIRGO) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आज आपली मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. कुटुंबियांशी वाद होऊन आपले मन दुखावले जाण्याची शक्यता असल्यानं आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक, मानसिक आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. दुपारनंतर मात्र अनुकूल वातावरण निर्माण होईल. भावंडांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू शकाल. प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. नशिबाची साथ लाभेल.
तूळ (LIBRA) :चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. दृढ विचार व वैचारिक संतुलन ह्यामुळं हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करू शकाल. वस्त्रालंकार व मनोरंजन ह्यासाठी पैसा खर्च होईल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती होईल. त्यामुळं निर्णय घेणं अवघड होईल. शक्यतो कुटुंबियांशी मतभेद टाळावेत. आपला अहंपणा बाजूला ठेवून व्यावहारिक निर्णय घेणे हितावह राहील.