मेष (ARIES) :चंद्र आज कर्क राशीत आहे. आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल. जास्त भावनिक होऊ नका. त्यामुळं बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. शक्यतो स्थावर संपत्तीची चर्चा टाळावी. अपघाताच्या शक्यतेमुळं वाहन जपून चालवावी आणि पाण्यापासून दूर राहावं लागेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.
वृषभ (TAURUS) :चंद्र आज कर्क राशीत आहे. आज शरीरानं, मनानं मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळं काल्पनिक जगाची सफर आपण कराल. कौटुंबिक विषयात रस घ्याल आणि प्रवासाचे बेत आखाल. आर्थिक व्यवहारांकडं अधिक लक्ष देऊ शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
मिथुन (GEMINI) :चंद्र आज कर्क राशीत आहे. आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणं हितावह राहील. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक योजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात कामे करू शकाल. मित्र आणि शुभेच्छुकांचा सहवास लाभल्यानं मनास आनंद मिळेल.
कर्क (CANCER) : चंद्र आज कर्क राशीत आहे. मित्राच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. भावनाशील व्हाल. आज काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह (LEO) : चंद्र आज कर्क राशीत आहे. आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. दलाली, चर्चा व वाद यापासून दूर राहणं हितावह राहील. कोर्ट-कचेरीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. वर्तनात संयमित आणि विवेकी राहावं लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या (VIRGO) : चंद्र आज कर्क राशीत आहे.आजचा दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात एखाद्या स्त्रीची भूमिका महत्वाची असेल. मित्रासह एखाद्या रम्य-स्थळी जाल. संततीकडून चांगली बातमी मिळेल.
तूळ (LIBRA) : चंद्र आज कर्क राशीत आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी-व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. आईकडून फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल.