महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' राशीच्या व्यक्तींना कामात यशप्राप्ती होईल; वाचा राशीभविष्य - Wednesday Horoscope

Today Horoscope : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल? जोडीदाराची साथ कोणाला मिळेल? कशी मिळेल? तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 21 फेब्रुवारी 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ....

Wednesday Horoscope
राशी भविष्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 1:07 AM IST

  • मेष (Aries): आज चंद्र मिथुन राशीत आहे. आजची सकाळची वेळ नवीन कार्य करण्यासाठी अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. व्यवसायात लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ खुश होतील. आपल्या विचारात एकदम बदल होईल. दुपार नंतर मात्र मनाचा खंबीरपणा कमी होऊन मन विचारात गढून जाईल. मानसिक थकवा जाणवेल. अपघाताची शक्यता असल्यानं जलाशया पासून दूर राहावे.
  • वृषभ (Taurus) : आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी आहे. मित्र आणि स्नेहीजनांच्या सहवासानं आपण आनंदित व्हाल. आजच्या दिवसाचा बहुतांश वेळ आर्थिक नियोजन करण्यासाठी द्यालवाल.
  • मिथुन (Gemini) : आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. आज आप्तेष्टांचा सहवास आनंददायी ठरेल. सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ होईल. मनात विविध प्रकारचे नकारात्मक विचार येतील, ते दूर सारणं हितावह राहील. व्यवसायात वातावरण अनुकूल असल्यानं मन प्रसन्न राहील. दिवसभर मनात उत्साह आणि चैतन्य दरवळेल.
  • कर्क (Cancer): आजचा दिवस प्राप्तीच्या प्रमाणात अधिक खर्च करण्याचा आहे. नेत्र विकार बळावतील. मानसिक चिंता वाढतील. कोणाशी वाद होऊ नयेत म्हणून आपल्या कृतीवर संयम ठेवा. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. आर्थिक लाभ संभवतात. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. मनातून नकारात्मक विचार दूर होऊ शकतील.
  • सिंह (Leo): आजची सकाळची वेळ फारच चांगली आहे. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत लाभदायक बातम्या प्राप्त होतील. मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ होईल. दुपार नंतर आपल्या बोलण्यामुळं काही समस्या उदभवण्याची शक्यता आहे. अपघाताची शक्यता आहे. एखादी मानसिक चिंता सतावेल. कुटुंबीय आणि संतती यांच्याशी मतभेद होण्याचे प्रसंग घडतील. प्रकृतीस त्रास संभवतो.
  • कन्या (virgo) : आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. कुटुंबियांशी सलोखा राहील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळू शकतील. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश होतील. त्यामुळं आपण आनंददित व्हाल. दुपार नंतर आपली उक्ती आणि कृती यांमुळं काही समस्या उदभवण्याची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो. जवळपासच्या एखाद्या रमणीय स्थळी सहलीस जाल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. मित्रांकडून लाभ होतील.
  • तूळ (libra) : आज सकाळी आपले मन चिंतातुर होईल. शारीरिक दृष्टया आळस वाढेल. नोकरीत वरिष्ठ नाराज होतील. संततीशी मतभेद संभवतात. दुपार नंतर कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. वरिष्ठांची मर्जी संपादन केल्यानं पदोन्नती मिळविण्याचा आपला मार्ग सुकर होईल. सामाजिक क्षेत्रातही मान- सन्मानाचे प्रसंग येतील. प्रकृती उत्तम राहील.
  • वृश्चिक (scorpio) : आज शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. हातून एखादे अवैध कार्य होण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते. आपल्या बोलण्यावर संयमित ठेवल्यास परिस्थिती आपणास अनुकूल होऊ शकेल. पोटदुखीच्या विकारानं त्रस्त व्हाल. व्यावसायिक क्षेत्रात अडचणी येतील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. व्यवसायात प्रतिकूलता जाणवेल.
  • धनू (sagittarius): आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. सकाळी मनोरंजनात्मक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दुपार नंतर मात्र मनात नकारात्मक विचारांचं वादळ निर्माण होईल. त्यामुळं मन दुःखी होईल. रागाचे प्रमाण वाढेल. कुटुंबीय आणि सहकार्यांशी वाद संभवतात.
  • मकर (capricorn): आज आपणास आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. सामाजिक मान- सन्मान संभवतात. आर्थिक लाभ होतील. दुपार नंतर मित्र यांच्या सहवासात आनंदित होऊ शकाल. वाहनसौख्य मिळेल. त्यामुळं मन प्रसन्न राहील. मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊन आनंदित व्हाल.
  • कुंभ (Aquarius): आज आपल्यात कलेविषयी विशेष गोडी निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संतती विषयक प्रश्न भेडसावतील. दुपार नंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. आर्थिक लाभ होतील. व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वाणीवर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल.
  • मीन (Pisces):आज आपण अती भावनाशील व्हाल. अती विचारांमुळं मानसिक थकवा जाणवेल. सबब जमीन, घर, संपत्ती इ. विषयी चर्चा टाळणे हितावह राहील. अपचन आणि पोटाच्या तक्रारी यामुळं शारीरिक अस्वस्थता जाणवेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस लाभदायक आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते.

हेही वाचा -

12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस ? वाचा राशीभविष्य

ABOUT THE AUTHOR

...view details