महाराष्ट्र

maharashtra

'या' राशींना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस ? वाचा आजचं राशीभविष्य - Horoscope 21 August 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 7:03 AM IST

Horoscope 21 August 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 21 August 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

मेष Horoscope 21 August 2024 : आपल्या राशीपासून चंद्र लाभ स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. स्नेही, स्वकीय आणि मित्रांसह सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांकडून लाभ होतील. त्यांच्यासाठी पैसा सुद्धा खर्च करावा लागेल. वडीलधारी आणि स्नेहीजन यांच्याशी संपर्क होऊन काही व्यवहार वाढतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीस जाण्याचा बेत आखू शकाल. अचानक धनलाभ संभवतो. संततीकडून एखाद्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता.

वृषभ :आपल्या राशीपासून चंद्र दशम स्थानी आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कामाच्या योजना यशस्वीपणे आखू शकाल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामं तडीस जातील. बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात वर्चस्व राहून आपलेपणा वाढेल. भेटवस्तू आणि मान - सन्मान प्राप्त झाल्यानं मन प्रसन्न होईल.

मिथुन : आपल्या राशीपासून चंद्र भाग्य स्थानी आहे. मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था आणि कटकटीचा राहील. शरीरानं थकाल आणि आळसामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटदुखीचा त्रास संभवतो. पैसा खर्च होईल. व्यवसायात अडचणी येतील. सहकारी सहकार्य करणार नाहीत. संततीची काळजी राहील. राजकीय अडचणी त्रास देतील. आज नवीन कार्यारंभ न करणं हितावह राहील. प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वाद टाळावेत.

कर्क : आपल्या राशीपासून चंद्र अष्टम स्थानी आहे. आज प्रत्येक गोष्टीत जपून व्यवहार करावा लागेल. कुटुंबीयांशी वाद संभवतात. वाणी आणि संतापावर नियंत्रण ठेवल्यास संभाव्य कटुता टळू शकेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. अवैध कामांपासून शक्य तितकं दूर राहावं.

सिंह : आपल्या राशीपासून चंद्र सातव्या स्थानी आहे. आज वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. भागीदार आणि व्यापारी यांच्याशी शांतपणे व्यवहार करावा. शक्यतो निरर्थक चर्चा किंवा वाद ह्यापासून दूर राहावे. कोर्ट- कचेरीच्या कामात फारसं यश मिळणार नाही. सामाजिक क्षेत्रात यश मिळणार नाही.

कन्या : आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या स्थानी आहे. आज उत्साह आणि स्वास्थ्य उत्तम राहील. घरी आणि नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. कार्यात यशस्वी व्हाल. अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होईल.

तूळ : आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संततीची काळजी सतावेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद - विवाद, बौद्धिक चर्चा यापासून शक्यतो दूर राहावं. आज सुरू केलेलं काम पूर्ण होऊ शकणार नाही. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. एखादी मानहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावेत.

वृश्चिक : आपल्या राशीपासून चंद्र चवथ्या स्थानी आहे. आजचा दिवस शक्य तितक्या शांतचित्तानं घालवावा. चिंतातुर मन आणि अस्वस्थ शरीर याचा आपणास त्रास होईल. संबंधीतांशी मतभेद संभवतात. आर्थिक हानीची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचे दस्तावेज काळजीपूर्वक करावेत.

धनू :आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. आजचा दिवस नव कार्यारंभास शुभ फलदायी आहे. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसह प्रवासाचे बेत ठरवाल. आरोग्य उत्तम राहील. नशिबाची साथ लाभेल. गूढ विषयांची गोडी वाटेल. आज कार्यसिद्धीचा दिवस आहे. सामाजिक मान - सन्मान होतील.

मकर : आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. आज कुटुंबीयांशी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यातील संयमच आपणाला वादातून बाहेर काढेल. सट्टे बाजारात गुंतवणूक करण्याचं नियोजन कराल. प्रकृती साधारणच असेल. डोळ्यांचा त्रास संभवतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावं.

कुंभ : आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक आणि मानसिक दृष्टया आनंदी राहाल. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसह प्रवासाचा आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. मिळालेल्या भेट वस्तूंमुळे आनंदी राहाल. आपल्या मनास स्पर्श करणारे विचार ऐकण्यात येतील.

मीन :आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या स्थानी आहे. आज अतीलोभ आणि हव्यास यात आपण फसण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. प्रकृती बिघडू शकते. मनाची एकाग्रता होणार नाही. मांगलिक कार्यावर पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद संभवतात.

ABOUT THE AUTHOR

...view details