- मेष :आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टया लाभदायक आहे. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. शरीर व मन स्वस्थ राहील. मित्र व कुटुंबीयांसह दिवस आनंदात घालवाल. जास्त लोकांच्या संपर्कात याल. व्यापारात वाढ होईल. आपल्या हातून लोकहिताचं एखादं काम होईल.
- वृषभ :आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपल्या विचारांचा मोठेपणा व वाणीची करामत इतरांना प्रभावित करेल. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. बौद्धिक चर्चा, वाद-विवाद ह्यात यशस्वी व्हाल. वाचन-लेखनात रस घ्याल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. कष्टाचे पूर्ण चीज झाले नाही तरी आपण पुढेच जात राहाल. पचनक्रियेची समस्या उदभवुन प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.
- मिथुन: आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज महत्त्वाचा निर्णय घेताना आपली द्विधा मनःस्थिती होईल. आईच्या बाबतीत संवेदनशील व्हाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. निद्रानाश झाल्यानं प्रकृती बिघडेल. शक्यतो प्रवास टाळा. पाणी आणि द्रव पदार्थ घातक ठरतील. जमीन, मिळकत यावर आज चर्चा करू नका.
- कर्क : आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस कामात यश व नव्या कामाचा प्रारंभ यासाठी अनुकूल आहे. मित्र आणि स्वकीयांचा सहवास आपणाला आनंद देईल. जवळचे प्रवास होतील. भावंडांशी सलोखा राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल. आर्थिक लाभ व समाजात आदर - सत्कार मिळेल. विरोधकांना पराभूत कराल. कोणाच्या प्रेमात पडाल.
- सिंह: आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज दूरस्थ स्नेही आणि नातलग याच्याशी झालेल्या पत्र व्यवहारामुळं लाभ होईल. कुटुंबात सुख शांती नांदेल. स्वादिष्ट भोजन मिळेल. निर्धारित कामात यश मिळेल. आयोजन व अतिविचार संकट निर्माण करतील. स्त्री मित्र मदतरूप ठरतील.
- कन्या: आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपल्या वैचारिक समृद्धी व मोहक वाणी यामुळं लाभ होऊन सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. प्रकृती उत्तम राहील व मन सुद्धा प्रसन्न राहील. आप्तेष्टांशी सुसंवाद साधल्यामुळं सुख व आनंद मिळेल. धनलाभ व प्रवास होईल.
- तूळ: आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपले बोलणं आणि व्यवहार ह्यावर आपणास संयम ठेवावा लागेल. कुटुंबीय आणि इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता आहे. परोपकाराचा बदला उपकारात मिळतो. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल. आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. आज अडचणींमुळं मनःशांती लाभणार नाही. त्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील.
- वृश्चिक: आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज आपल्या कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल. पत्नी आणि संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. नोकरी-व्यवसायात संधी मिळून उत्पन्न वाढेल. मित्रांसह सहलीला जाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. वडीलधार्यांच्या सहकार्यामुळं प्रगती करू शकाल.
- धनू : आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ खूश असल्यामुळं पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. वडील तसेच सरकारकडून फायदा मिळेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास घडू शकतो. इतर लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील.
- मकर: आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज बौद्धिक कार्य आणि व्यवसायात आपण नवी शैली वापराल. साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. दूरचं प्रवास घडतील. विरोधक, प्रतिस्पर्धी यांच्याशी चर्चा तसेच अनावश्यक खर्चापासून दूर राहा.
- कुंभ : आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज अवैध काम आणि नकारात्मक विचारां पासून दूर राहावं. खूप विचार आणि संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. आरोग्य बिघडेल. कुटुंबात खडाजंगी होईल. खर्चाचे प्रमाण वाढल्यानं आर्थिक चणचण भासेल. यातून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
- मीन: आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी आहे. दैनंदिन कामातून बाहेर पडून आज आपण सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहलीस जाऊ शकता. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. कलावंत किंवा कारागीरांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारीसाठी अनुकूलता लाभेल. दांपत्य जीवनात जवळीक निर्माण होईल. सार्वजनिक जीवनात मान-सन्मान होण्याची शक्यता आहे.