महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

कोणत्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायी? वाचा राशी भविष्य - Horoscope 15 July 2024 - HOROSCOPE 15 JULY 2024

Horoscope 15 July 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 2024
राशी भविष्य 2024 (Etv Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 12:10 AM IST

  • मेष (ARIES) :चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. आजचा दिवस मानसिक समाधानाचा आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. त्याचबरोबर सुखद प्रवासाचा आनंद व रूचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी सुद्धा लाभेल. एखादी हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल. तरीही आपले विचार आणि अती उत्साहाला आवर घालावा लागेल. विदेशी व्यापाराशी संबंधित लोकांना यश व लाभ मिळेल. आज शक्यतो बौद्धिक चर्चा करताना वाद टाळून समाधानी वृत्तीचा स्वीकार करणे उचित ठरेल.
  • वृषभ (TAURUS) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. कामात आघाडीवर राहाल व योजनेनुसार कार्य पूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. स्त्रीयांना माहेरहून एखादी सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्टया आनंदात राहाल. आरोग्य उत्तम राहील.
  • मिथुन (GEMINI) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. आज संतती आणि वैवाहिक जोडीदार ह्यांच्या प्रकृतीची काळजी राहील. वाद - विवाद, चर्चा ह्यात खोलात जाऊ नका. आत्मसन्मान दुखावला जाईल. मैत्रिणींमुळं खर्च आणि नुकसान होण्याची शक्यता आहे. पोटाच्या व्याधींमुळं त्रस्त व्हाल. नवीन कार्यारंभ आणि प्रवास शक्यतो टाळा.
  • कर्क (CANCER) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज सांभाळून राहावं लागेल. शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता लाभण्यासाठी आज प्रयत्न करावे लागतील. छातीत दुखणं किंवा अन्य विकारांचा त्रास संभवतो. कुटुंबियांशी उग्र चर्चा किंवा वाद झाल्यानं सुद्धा मन दुःखी होईल. पैसा मोठया प्रमाणावर खर्च होईल. सामाजिक मानहानी संभवते. निद्रानाशाचा त्रास होण्याची शक्यता आहे.
  • सिंह (LEO) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. आज शरीर, मन, स्वस्थ प्रफुल्लित राहील. शेजारी-पाजारी आणि भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. जवळचा प्रवास घडेल. प्रगतीच्या संधी चालून येतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदित करेल. प्रेमपूर्ण संबंधाचे महत्व लक्षात येईल. आर्थिक लाभ होईल.
  • कन्या (VIRGO) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आज मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. कुटुंबियांशी गैरसमज किंवा मतभेद होतील. नाहक खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. बौद्धिक चर्चा करताना भांडण होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवासाची शक्यता आहे. आयात-निर्यातीच्या व्यवसायात यश मिळेल.
  • तूळ (LIBRA) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. सांप्रत काळी चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल. आज कलात्मक व सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. भागीदारांचे विचार पटतील. मौज-मस्ती व मनोरंजनावर खर्च कराल. दांपत्य जीवनात जवळीक वाढेल.
  • वृश्चिक (SCORPIO): चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आज हर्षोल्हास आणि मनोरंजनावर पैसे खर्च कराल. मानसिक चिंता आणि शारीरिक तगमग यांमुळं त्रासून जाल. वाणीवर संयम नसल्यानं भांडणतंटा होऊ शकतो. कुटुंबीय व स्नेही यांच्याशी पटणार नाही.
  • धनू (SAGITTARIUS): चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आज प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आर्थिक, सामाजिक आणइ कौटुंबिकदृष्टया आजचा दिवस लाभदायक आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. मित्रांकडून, विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. उत्पन्नाची साधने वाढतील. व्यापारात वाढ होऊन लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. मंगलकार्ये होतील. उत्तम भोजनाचा आस्वाद मिळेल.
  • मकर (CAPRICORN) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आज व्यवसायात धन, मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कष्टाचे चीज होईल. घर, कुटुंब व संततीच्या बाबतीत आनंद व समाधानाची भावना राहील. व्यावसायिक कामानिमित्त धावपळ वाढेल. नोकरीत बढती मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. सरकार, मित्र आणि संबंधितांकडून लाभ होतील.
  • कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आज आपणास अस्वास्थ्य जाणवेल. पण मानसिकदृष्टया शांतता जाणवेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. तसेच प्रतिस्पर्ध्यांशी वाद करणं योग्य ठरणार नाही. मौज-मजेसाठी जास्त खर्च कराल. एखादा प्रवास संभवतो. परदेशगमनाची शक्यता वाढेल. तसेच परदेशातून आनंददायी बातम्या मिळतील. संततीची काळजी लागून राहील.
  • मीन (PISCES) :चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. प्रकृतीकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. आजारपणावर अधिक खर्च होईल. कुटुंबियांशी संयमाने वागावं लागेल. अचानक धनलाभ होऊन आपल्या मनावरील भार काही अंशी हलका होईल. व्यापार्‍यांची जुनी येणी वसूल होतील.

हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details