- मेष : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस अस्वास्थ्य आणि त्रासाचा आहे. ताप, सर्दी, खोकला याचा त्रास संभवतो. इतरांचे भले करण्याच्या नादात आपणावर संकटे कोसळतील. शक्यतो आज आर्थिक व्यवहार टाळावेत. तसेच कोणाला जामीन राहू नये. निर्णयशक्तीच्या अभावामुळं मनःस्थिती द्विधा होईल. त्यामुळं चिंता वाढतील. अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता आहे.
- वृषभ : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धनवृद्धी आणि पदोन्नती संभवते. व्यापारी सौदे यशस्वी होतील. कुटुंबीय आणि मित्रांसह आनंदाचे सुखद क्षण अनुभवू शकाल. एखादा प्रवास होऊन त्यातून काही लाभदायी नवीन संबंध प्रस्थापित होतील.
- मिथुन : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. सहकारी आणि वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक मान - मरातब वाढेल. बढतीची शक्यता आहे. मित्राकडून भेटवस्तू मिळतील. आरोग्य उत्तम राहील. प्रापांचिक जीवन आनंदपूर्ण राहील.
- कर्क : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज मांगलिक कार्यात आपला सहभाग असेल. मांगलिक कार्यात सहभागी झाल्यानं आनंदित व्हाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. आरोग्य उत्तम राहील. मन पण चिंतामुक्त होईल. अचानक धनलाभ संभवतो. नशिबाची साथ लाभेल.
- सिंह : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज खूप सावध राहावं लागेल. आज विपरित घटनांना तोंड द्यावं लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती बिघडल्यानं अचानक खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी संयमानं वागावं लागेल. अवैध कामांपासून दूर राहावं. मानसिक शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल.
- कन्या : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. जोडीदाराशी जवळीक साधून सुखद क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्य जीवनात गोडी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटेल. सामजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत मान - प्रतिष्ठा वाढेल. भागीदारांशी संबंध सलोख्याचे राहतील. उत्तम भोजन, वस्त्रालंकार, वाहनप्राप्ती होईल.
- तूळ :आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज घरात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आवश्यक कामांवरच खर्च होईल. नोकरीत यश मिळेल. आईच्या घराण्याकडून चांगल्या बातम्या येतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. सहकारी आणि हाताखालचे नोकर यांचं सहकार्य लाभेल.
- वृश्चिक : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आपल्या घरगुती जीवनात शांतीचे आणि आनंदाचं वातावरण राहील. तसंच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचं सहकार्य पूर्णपणे मिळेल. मित्र- मैत्रिणी भेटतील. स्त्रियांना माहेरहून चांगली बातमी समजेल. धन लाभ होईल तसेच खोळंबलेली कामे मार्गी लागतील.
- धनू : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज शक्यतो प्रवास टाळावा. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. संततीचे आरोग्य आणि अभ्यास या संबंधी काळजी वाटेल. कामे अयशस्वी झाल्यानं नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. साहित्य आणि कला याविषयांची गोडी निर्माण होईल. कल्पना जगात विहार कराल. प्रिय व्यक्तींच्या सहवासात वेळ चांगला जाईल. तार्किक आणि बौद्धिक चर्चेापासून शक्यतो दूर राहा.
- मकर : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज शारीरिक स्वास्थ्य आणि मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळं वातावरण खिन्न बनेल. शरीरात स्फूर्ती आणि उत्साहाचा अभाव जाणवेल. जवळच्या नातलगांशी मतभेद होतील. छातीत वेदना होतील. शांत झोप मिळणार नाही. सामाजिक मानहानी होण्याची शक्यता आहे. वाणी संयमित ठेवावी लागेल. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. मनःस्ताप आणि प्रतिकूल वातावरणामुळं दिवस कटकटीचा जाईल.
- कुंभ: आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल. मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. भावंडांसह एखादे नवीन कार्य कराल आणि त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. मित्र, नातेवाईक भेटतील. छोटया प्रावसाचे बेत आखाल. नशिबाची साथ लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
- मीन : आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आनंद, उत्साह व प्रसन्न तन-मन यामुळं आज चैतन्य, स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. एखाद्या मंगल कार्याला हजेरी लावाल. एखादा निर्णय घेताना मनःस्थिती द्विधा झाली तर तो निर्णय स्थगित ठेवावा. कुटुंबीयांसह मिष्ठान्नाचा आस्वाद घ्याल. प्रवास होईल. दांपत्य जीवन आनंदी राहील.