- मेष (ARIES) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज आपण एखाद्या अडचणीत सापडू शकता. नोकरीत इतरांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद संभवतात. नशिबाची साथ मिळणार नाही. कामात त्वरित यश मिळणार नाही. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. वैवाहिक जीवनातील वातावरण आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. काही नियोजित आर्थिक लाभ होतील.
- वृषभ (TAURUS) :आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपण हळवे व्हाल आणि त्यामुळं आपणास बेचैनी जाणवेल. शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा त्याचा नकारात्मक परिणाम होईल. नवे कार्य आज सुरू करू नका. उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवा. खाण्या-पिण्याकडं लक्ष द्या. व्यवसायात विघ्ने येतील. नोकरीत वरिष्ठांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. तसेच प्रतिस्पर्ध्यांशी सुद्धा वाद संभवतात. कामात विलंबाने यशप्राप्ती होईल, तेव्हा धैर्याने वागावे लागेल.
- मिथुन (GEMINI) :आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपली मनःस्थिती मनोरंजनात्मक कार्यात सहभागी होण्याची असल्यानं मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. रुचकर भोजन आणि उंची वस्त्रालंकार लाभतील. दुपारनंतर आपण जास्त हळवे व्हाल आणि त्यामुळं मनातील दुःख वाढेल. आर्थिक खर्चात वाढ होईल. अवैध कार्यापासून दूर राहा. मनाला शांती मिळू शकेल अशा एखाद्या प्रवृत्तीत सहभागी व्हा.
- कर्क (CANCER) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना दिवस लाभदायी आहे. नोकरीतील उत्तम कामगिरीमुळं बढती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. दुपारनंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसह सहल आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेण्याची संधी प्राप्त होईल. व्यापार-व्यवसायात भागीदारांशी यशस्वीपणे विचार विनिमय करू शकाल.
- सिंह (LEO) :आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी आहे. साहित्य आणि कला ह्यातील गोडी वाढेल. पोटाच्या तक्रारीमुळं अस्वस्थता जाणवेल. दुपारनंतर आर्थिक अडचण दूर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रकृतीत सुधारणा होईल. व्यापार-व्यवसायात लाभ होतील.
- कन्या (VIRGO): आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मातेची प्रकृती बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानी संभवते. अपघाताची शक्यता असल्यानं जलाशयापासून दूर राहावे. शक्यतो प्रवास टाळावेत. संततीचे आरोग्य आणि अभ्यास ह्या विषयी चिंता निर्माण होईल. रागावर संयम ठेवा. वाद होण्याची शक्यता असल्यानं बौद्धिक चर्चेपासून दूर राहणे हितावह होईल.
- तूळ (LIBRA) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करण्यास अनुकूल आहे. गूढ विद्यांचे आकर्षण निर्माण होईल. दुपारनंतर मात्र आनंद आणि उत्साहाचा अभाव जाणवेल. कुटुंबात कलह संभवतात. मानहानी संभवते.
- वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपल्या एखाद्या वक्तव्यामुळं कुटुंबीयांची मने दुखावण्याची शक्यता आहे. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मनाची अवस्था द्विधा होईल. कामाचा व्याप वाढेल. दुपारनंतर मात्र मनातील मरगळ दूर होईल. मित्र आणि संबंधीतांशी सुसंवाद साधू शकाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. नशिबाची साथ मिळेल.
- धनू (SAGITTARIUS) :आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्टया उत्साहित आणि ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहाने कराल. प्रवास संभवतो. दुपारनंतर मात्र द्विधा मनःस्थिती होईल. घरात आणि कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. वायफळ खर्च होतील.
- मकर (CAPRICORN) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपल्या बोलण्या वागण्याने भांडण होण्याची शक्यता असल्यानं त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतापाचे प्रमाण वाढेल. मन चिंतीत राहील. मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करा. दुपारनंतर स्फूर्ती आणि उत्साह वाढेल. घरातील वातावरण शांत आणि आनंददायी होईल. एखाद्या मंगलकार्यात सहभागी होऊ शकाल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.
- कुंभ (AQUARIUS) :आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल व त्याच्या फल स्वरूप आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकल्यानं त्यांच्या आनंदात भर पडेल. दुपारनंतर मात्र घरातील वातावरण कलुषित होईल. शरीर स्वास्थ्य बिघडेल. आपला संताप संयमित ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
- मीन (PISCES) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस आपणास सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. हातून परोपकारी कार्य घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळं व्यापार वृद्धी करू शकाल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाचं कौतुक करतील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. वडील आणि वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळून त्यांच्याकडून लाभ होईल. उत्पन्नात वाढ होईल.
हेही वाचा -