ठाणे Lok Sabha Election 2024: 'गड किल्ले हे कोणाचे नसतात, गड किल्ले हे सर्वसामान्य नागरिकांचे असतात'. मतदार हे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवाराला संधी देतात, असं सांगत राजन विचारे (Rajan Vichare) यांनी सांगितल. राजन विचारे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या गडातच 15 किलोमीटर पायी जाऊन प्रचार केला. यावेळी विचारे यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) लक्ष केलं.
मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात प्रचार रॅली: महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज संपूर्ण ठाणे शहरात फिरून मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात दौरा केला. मतदारांना मतदान करण्याचा आवाहन केलं. या रॅलीमध्ये विशेषता त्यांनी कोपरी या एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात लक्ष केंद्रित केलं होतं. दुपारनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या किसन नगर भागामध्ये प्रचार रॅली केली. वारं फिरलय केंद्रीय मंत्री महाराष्ट्रातले मंत्री यांनी येऊन या ठाण्याच्या परिसरामध्ये काहीही उपयोग होणार नाही, असं सांगत एकनाथ शिंदे यांच्या परिसरामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केला. यावेळी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राजन विचारे यांच्यासोबत प्रचार करत होते. जागोजागी त्यांचे सत्कार होत होते. या परिसरात त्यांनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत सर्वसामान्य नागरिकांना मतदान करण्याचा साद घातलेली आहे.