पुणे Pune Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीचं मतदान झालं असून आता निकालाची प्रतिक्षा आहे. शनिवारी संध्याकाळी विविध माध्यमांकडून एक्झिट पोल दाखविण्यात आले असून या एक्झिट पोलमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे विजयी होणार असल्याचं दाखवण्यात आलंय. आता यावर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपलं मत व्यक्त केलंय. 4 तारखेला पुणेकरांचा निकाल येणार आहे आणि या निकालात पुणेकर हेच जिंकणार असल्याचा विश्वास धंगेकरांनी व्यक्त केलाय.
एक्झिट पोलनंतरही रवींद्र धंगेकरांचा कॉन्फिडन्स; म्हणाले, "4 तारखेला पुणेकरांचा...." - lok sabha election result - LOK SABHA ELECTION RESULT
Pune Lok Sabha Constituency : काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी 4 तारखेला पुणेकरांचा निकाल येणार आहे आणि या निकालात पुणेकर हेच जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय.

Published : Jun 2, 2024, 9:26 PM IST
पुणेकर जिंकणार : पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले की, "कालपासून अनेक एक्झिट पोलवर अनेक निकाल येत आहेत. ते निकाल पाहून ते खुश झाले असून 4 तारखेला पुणेकरांचा निकाल येणार आहे आणि यात पुणेकर जिंकणार आहे." तसंच ज्यांना दोन दिवस आनंद घ्यायचं त्यांना घेऊ द्या, असा टोला यावेळी धंगेकर यांनी लगावलाय.
एक्झिट पोलचे अंदाज चुकतील : तसंच पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेला प्रतिसाद पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हेच खासदार होतील. एक्झिट पोलचे अंदाज चुकतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केलाय. लोकसभेची निवडणूक पुणेकरांनीच हाती घेतली होती, प्रचारात त्याचा आम्हाला पदोपदी अनुभव आला. महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकदिलानं धंगेकर यांचा प्रचार केला. पदयात्रा, कोपरा सभा यामधून सर्वसामान्य नागरिक उत्स्फूर्तपणे भेटून धंगेकर यांना पाठिंबा देत होते आणि धंगेकरच खासदार व्हावेत अशी इच्छा व्यक्त करत होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून पुणेकरांची इच्छा पूर्ण झाल्याचं दिसून येईल असंही यावेळी मोहन जोशी म्हणाले.
हेही वाचा :
- "उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत..."; लोकसभा निकालाच्या काही तासाआधी शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा - Uddhav Thackeray Mahavikas Aghadi
- लोकसभा निवडणुकीच्या निकालात कोण मारेल बाजी, काय आहे एक्झिट पोलचा अंदाज? - lok sabha 2024 exit poll
- "उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत..."; लोकसभा निकालाच्या काही तासाआधी शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा - Uddhav Thackeray Mahavikas Aghadi