महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

तिसऱ्या आघाडीच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बच्चू कडूंसह 'हे' उमेदवार रिंगणात

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या आघाडीनं आपल्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. वाचा संपूर्ण यादी...

Parivartan Mahashakti aghadi
परिवर्तन महाशक्ती (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 10 hours ago

Updated : 10 hours ago

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. त्यानुसार 20 नोव्हेंबरला मतदान कर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील तिसऱ्या आघाडीनं अर्थात 'परिवर्तन महाशक्ती'नं आपल्या आठ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.

तिसऱ्या आघाडीची स्थापना : महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाड्यांमध्ये राज्यात जोरदार टक्कर होणार आहे. या दोन्ही आघाड्यांमध्ये काही छोटे घटक पक्ष आणि संघटना सहभागी झाल्या होत्या. मात्र, विविध कारणांमुळं वाद झाले आणि हे छोटे पक्ष आणि संघटना या दोन आघाड्यांमधून बाहेर पडले. त्यानंतर या सर्वांनी एकत्र येत 'परिवर्तन महाशक्ती' नावाची तिसरी आघाडी तयार केली. या आघाडीत बच्चू कडू, राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती या मुख्य नेत्यांचा समावेश आहे.

'परिवर्तन महाशक्ती'च्या उमेदवारांची पहिली यादी (ETV Bharat)

'परिवर्तन महाशक्ती' महाराष्ट्र राज्य विधानसभा २०२४ अधिकृत उमेदवारांची यादी

उमेदवाराचे नाव

1. ओमप्रकाश उर्फ बच्चू बा. कडू

मतदार संघ

४२ - अचलपूर

प्रहार जनशक्ती पक्ष

2. अनिल छबिलदास चौधरी

११ - रावेर यावल

प्रहार जनशक्ती पक्ष

3. गणेश रमेश निंबाळकर

११८ - चांदवड

प्रहार जनशक्ती पक्ष

4. सुभाष साबणे

९० - देगलूर बिलोली (SC)

प्रहार जनशक्ती पक्ष

5. अंकुश सखाराम कदम

१५० - ऐरोली

महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

6. माधव दादाराव देवसरकर

८४ - हद‌गाव हिमायतनगर

महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

7. गोविंदराव सयाजीराव भवर

९४ - हिंगोली

महाराष्ट्र राज्य समिती

8. वामनराव चटप

७० - राजुरा

स्वतंत्र भारत पक्ष

राजू शेट्टी उमेदवार ठरवतील : शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्या आहेत. पण त्यावर कोण उमेदवार असतील हे राजू शेट्टी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन ठरवली, अशी माहिती 'परिवर्तन महाशक्ती' आघाडीकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. भाजपाच्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट, वाचा संपूर्ण यादी
  2. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे सात शिलेदार रिंगणात; 'या' दिग्गजांना मिळालं तिकीट
  3. भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी अनेकांसाठी लॉटरी, तर काहींसाठी धक्का
Last Updated : 10 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details