महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

'त्या' पक्षाला कोणीही मतदान करणार नाही...; उद्धव ठाकरेंसह सुषमा अंधारेंवर ज्योती वाघमारेंचा हल्ला - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे (Shirdi Lok Sabha Constituency) उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या संकल्प महाविजय प्रचारार्थ उद्धव ठाकरेंसह सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर शिंदे गटाच्या प्रचारक ज्योती वाघमारे यांनी जोरदार टीका केलीय.

Jyoti Waghmare On Sushma Andhare
सुषमा अंधारे आणि ज्योती वाघमारे

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 8:11 PM IST

सभेत बोलताना ज्योती वाघमारे

शिर्डी (अहमदनगर) Lok Sabha Election 2024:एककीडं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे मैदान गाजवत असताना, आज श्रीरामपूर येथे ज्योती वाघमारे यांनी पहिल्याच भाषणात सुषमा अंधारेंवर (Sushma Andhare) निशाणा साधला. ज्या आक्का बाईला उद्धव ठाकरे स्टार प्रचारक म्हणून फिरवत आहेत. त्याच आक्काबाईनं बाळासाहेब ठाकरेंना थेरडा म्हटलं होतं. स्वतःचा बाप्पाचा अपमान करणाऱ्या आक्काबाईला उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून मिरवत आहेत. नागरिक उद्धव ठाकरेंना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत, अशी खरमरीत टीका शिंदे गटाचा प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केलीय.


हिंदू विरोधी वक्तव्य करणाऱ्याला कोणीही मतदान करणार नाही : शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या संकल्प महाविजय प्रचारार्थ उद्धव ठाकरेंसह सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाच्या प्रचारक ज्योती वाघमारे यांनी जोरदार टीका केलीय. भाषणात बोलताना कधी प्रभू श्रीराम यांचा अपमान, शबरीच्या भक्तीचा अपमान, असं हिंदू विरोधी वक्तव्य करणाऱ्या आक्काबाई ज्या पक्षाच्या स्टार प्रचारक आहेत, त्या पक्षाला कोणीही मतदान करणार नाही.


"कुंकू धन्याचं, मंगळसूत्र गाण्याचं आणि...: शिर्डी लोकसभेचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी साईबाबांच्या समाधीची शपथ घेवून सांगितलं होतं शिवसेना सोडणार नाही. साईबाबांची शपथ धुडकावून लावत वेगवेगळ्या पक्षात जाणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांची परस्थिती अशी झालीय की, "कुंकू धन्याचं, मंगळसूत्र गाण्याचं आणि लेकरू मण्याचं" अश्या शेलक्या भाषेत वाघमारे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर टीका केलीय. महायुतीचा मेळावा असल्यानं व्यासपीठावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक उपस्थित होते. त्याचं नावे घेतांनाही ज्योती वाघमारे यांनी जुळविलेल्या यमकानेही एकच हाशा झाल्याचं बघावयास मिळलंय.



हेही वाचा -

  1. निवडणुकां होऊ द्या... युद्ध करून पाकव्याप्त काश्मीरसह भारताचा नकाशा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही; दीपक केसरकर यांचं मोठे वक्तव्य - Deepak Kesarka
  2. शिवसेना ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का; ...म्हणून मी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतोय, माजी मंत्री बबन घोलप यांचा निर्णय - LOK SABHA ELECTION 2024
  3. आमदार रवी राणांपेक्षा त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा दुप्पट श्रीमंत! - Navneet Rana Property

ABOUT THE AUTHOR

...view details