महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"जामनेरला मुक्कामी राहून, मला पाडून दाखवा", गिरीश महाजनांचं एकनाथ खडसेंना ओपन चॅलेंज - Girish Mahajan - GIRISH MAHAJAN

Girish Mahajan on Eknath Khadse : जळगावच्या जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांची सभा झाली. या सभेतून त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं. यावेळी मला पाडायचं असेल तर जामनेरला मुक्कामी राहा आणि मला पाडून दाखवा, असं ओपन चॅलेंज त्यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दिलय.

Girish Mahajan open challenge to Eknath Khadse during Jamner Sabha
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2024, 12:40 PM IST

जळगाव Girish Mahajan on Eknath Khadse : विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वीच जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे आमने-सामने आले आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर घणाघाती आरोप केले होते. त्याला आता गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर देत 'मला पाडून दाखवा' असं ओपन चॅलेंज दिलंय. ते जामनेरमध्ये बोलत होते.

भाजपा जामनेर विधानसभा मतदारसंघाची विस्तृत बैठक शुक्रवारी (27 सप्टेंबर) जामनेर येथील बाबाजी राघो मंगल कार्यालयात झाली. यावेळी खासदार बंशीलाल गुर्जर, जामनेर विधानसभा निवडणूक प्रभारी नेता आशिष देसाई यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

गिरीश महाजन यांची जामनेर येथील सभा (ETV Bharat Reporter)

गिरीश महाजन काय म्हणाले? : यावेळी बोलत असताना गिरीश महाजन म्हणाले, "सर्व ठिकाणी मी-मी करणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतसुद्धा त्यांना जिंकता आलेली नाही. त्यामुळं त्यांनी बाकीच्या गोष्टींवर बोलू नये. एकनाथ खडसे म्हणतात की मी जामनेर तालुक्यात हे धरण केलं ते धरण केलं, मग स्वतःच्या मतदारसंघातील बोदवड गावात महिना महिनाभर पाणी येत नसून मोठी पाणी टंचाई दूर करा, नंतर विकासाबाबत बोला. खडसेंना जर मला पाडायचं असेल तर तुम्ही इथं मुक्कामी राहून पाडून दाखवा. केवळ काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात. एकनाथ खडसे इतकेच खरे असतील तर त्यांची आणि माझी नार्को टेस्ट करावी", असं महाजन म्हणाले.


एकनाथ खडसे यांची टीका : काही दिवसांपूर्वी शिवस्वराज्य यात्रेदरम्यान एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली होती. ते म्हणाले, "2009 च्या विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन माझे पाय धरायचे आणि सांगायचे की मला वाचवा. मी शत्रुघ्न सिन्हा यांची सभा घेतली त्यामुळं त्यावेळेस ते निवडून आले होते. आता गिरीश महाजन यांना आणून मी पाप केलं असं मला वाटतं. या मतदारसंघात मी काम केलय. आज सरकार कोणाचंही असलं तरी या कामाचं श्रेय आपलं आहे. आज मंत्री असले तरी यांनी काय केलं? आज गावात रस्ते नाही, सुविधा नाहीत, ग्रामविकास मंत्र्यांचं लक्ष कुठंय?", असा खोचक सवालही त्यांनी केला.

हेही वाचा -

  1. जामनेर मतदारसंघातील रस्त्यावरच्या चिखलात मंत्री गिरीश महाजन यांची कसरत, ग्रामस्थांनी घेरल्यावर काढला पळ - Girish Mahajan Viral Video
  2. गिरीश महाजन यांच्याकडं लोण्याचं मडकं, कुठं लोणी लावतात सांगणार नाही; वडेट्टीवारांची महाजनांवर टीका - Vijay Wadettiwar
  3. 'आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडलेलं नाही' : जरांगेंचं समाधान होत नसेल, तर आम्ही काय करणार - गिरीश महाजन - Maratha reservation

ABOUT THE AUTHOR

...view details