महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

'लाडकी बहीण' योजनेमुळं सावत्र भावाच्या पोटात दुखू लागलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला - Majhi ladki Bahin Yojana - MAJHI LADKI BAHIN YOJANA

Majhi Ladki Bahin Yojana : राज्याच्या अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' जाहीर करण्यात आली. या योजनेनुसार राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. मात्र, या योजनेमुळं सावत्र लाडक्या भावाच्या पोटात दुखू लागले आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव न घेता लगावला.

Eknath Shinde on Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 8:23 PM IST

मुंबई Majhi Ladki Bahin Yojana:ठाणे शहरातील ठाकरे गटातील युवा सेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेना (शिंदे गटात) मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नंदनवन निवासस्थानी प्रवेश केला. यावेळी या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं. राज्यात मागील अडीच वर्षात सर्व क्षेत्रात विकास कामांचा धडाका सुरू आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. यानंतर सध्या राज्यात लाडक्या बहिणीची सर्वत्र चर्चा आहे. मात्र, यामुळं विरोधकांच्या पोटात पोटसूळ उठला असल्याची टीका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांवर केली आहे.



सावत्र भावाच्या पोटात दुखू लागले :पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सध्या राज्यात मुख्यमंत्री 'लाडकी बहीण' योजनेची सर्वत्र चर्चा आहे. मोठ्या प्रमाणात गाव-खेड्यात माता-भगिनी अर्ज दाखल करत आहे. या गर्दीचं चित्र विरोधकांना दिसत आहे. मात्र, लाडका बहीण योजनेमुळं सावत्र लाडक्या भावाच्या पोटात दुखू लागले आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. जेव्हा आम्ही लाडकी बहीण योजना आणली, तेव्हा लाडकी बहीण आहे, मग लाडका भाऊ का नको? असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणून आम्ही लाडका भाऊ योजना आणली. शेतकऱ्यांची वीज बिले माफ केली. त्यांच्या सरकारने काही केलं नव्हतं. परंतु आम्ही योजना आणल्यामुळं विरोधकांच्या पोटात पोटसूळ उठला आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली आहे.



जीवन पूर्ववत होईल: गुरुवारी पुण्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. धरणाचे पाणी अनेक घरात शिरले. यामुळं लोकांची तारांबळ उडाली आहे. आज पावसाने जरी उसंत घेतली तरी जिथून पाण्याचा विसर्ग झाला आहे, पाण्याचा निचरा झाला आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. साप, विंचू असे प्राणी सापडत आहेत. त्यामुळं लोकांना याचा त्रास होतोय. म्हणून युद्धपातळीवर येथील घाणीचे साम्राज्य साफ करावं असे निर्देश जिल्हाधिकारी, आयुक्त यांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच लवकरच येथील लोकांचे जीवन पूर्ववत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.



लाडका भाऊ आणि बहीणच उत्तर देतील : मागील दोन वर्षात सरकारने कल्याणकारी योजना आणल्या आहेत. अनेक विकास कामे केली आहेत. आता ज्या योजना आणल्या आहेत त्या विरोधकांना अपेक्षित नव्हत्या. म्हणून त्यांना वाईट वाटत आहे. मुख्यमंत्री 'लाडकी बहीण', 'लाडका भाऊ' या योजना आणल्या आहेत. यासाठी पैसा कुठून आणणार असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. परंतु पैसाची तरतूद झाली आहे. भविष्यात विरोधकांना 'लाडका भाऊ' आणि 'लाडका बहीण' हेच उत्तर देतील. कधीपण लाडक्या मुलापेक्षा लाडका भाऊ आणि लाडकी बहीण बरे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. तसेच नारायण राणे यांनी 288 जागांवर भाजपा निवडणूक लढवणार आहे यावर मुख्यमंत्री म्हणाले की, महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. महायुती एकत्र निवडणूक लढवणार आहे. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे.

हेही वाचा -

  1. अमरावतीत लाडकी बहीण योजनेसाठी खास मदत कक्ष; अडचणी असल्यास बिनधास्त करा 'या' नंबरवर कॉल - Majhi ladki Bahin Yojana
  2. 'लाडक्या बहिणी'साठी अजित पवारांची मोठी घोषणा; यंदाच्या रक्षाबंधनला भेटणार मोठी ओवाळणी - Mazi Ladki Bahin Yojana
  3. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; जिल्हा बँकेच्या पातळीवर राबविली जाणार योजना - ladki bahin yojana

ABOUT THE AUTHOR

...view details