महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

'ईटीव्ही भारत'च्या उलटतपासणीला उज्वल निकम यांनी दिली मनसोक्त उत्तरं; पाहा खास मुलाखत - Ujjwal Nikam Interview - UJJWAL NIKAM INTERVIEW

Ujjwal Nikam Interview : उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा आणि आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर भाजपानं देखील सरकारी वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर केलीय. याविषयी "ईटीव्ही भारत'शी उज्वल निकम यांनी संवाद साधलाय.

Ujjwal Nikam Interview
उज्वल निकम खास मुलाखत (ETV Bharat GFX)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 8:38 PM IST

Updated : May 2, 2024, 9:54 PM IST

ॲड. उज्वल निकम यांची खास मुलाखत (ETV Bharat Reporter)

मुंबई Ujjwal Nikam Interview : येत्या 20 मे रोजी मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रचाराचा सपाटा सर्वच राजकीय पक्षांनी लावलाय. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभांना रंग चढलाय. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर-मध्य मुंबईत सरकारी वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना भाजपानं उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्याशी 'ईटीव्ही भारत'नं संवाद साधलाय.

देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलं : ॲड.उज्वल निकम यांनी सांगितलं की, "मला उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी मिळेल याबद्दल काहीच अपेक्षित नव्हतं. कारण मी आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाचा सभासद नव्हतो. फक्त भाजपाची उमेदवारी जाहीर झाली म्हणून मी भाजपाचा सभासद झालो. पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलं आहे. तसेच अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा यासंदर्भात त्यांनी योजना आणल्या, ज्यामुळं भारताला एक महासत्ता म्हणून बघितलं जातंय. याबद्दल मला नेहमीच कौतुक वाटतं."

राजकारण आणि वकिली दोन भिन्न भाग : पुढं बोलताना ॲड.निकम म्हणाले की, "मला उमेदवारीबद्दल विचारणा केली तेव्हा मी विचार केला की, ही माझ्या आयुष्याची सेकंड इनिंग आहे. तसंच राजकारण आणि वकिली हे दोन भाग भिन्न आहेत. शेवटी विचार केला की, आपण राजकारणात गेलं पाहिजे. जे ज्ञान आपण संपादन केलं आहे ते आपल्याला कशा रीतीनं देशाच्या सुरक्षेसाठी आणि सामान्य माणसाकरता उपयोगात आणता येईल याचा ध्यास मला होता."

वर्षा गायकवाड तगड्या उमेदवार : "वर्षा गायकवाड या सीनियर पॉलिटिशन आहेत. काही वर्ष त्या मंत्री होत्या. त्यामुळं मी कोणाला हलकसं घेत नाही. एक तगडा उमेदवार म्हणून मी त्यांच्याकडं पाहतो, ही चांगली गोष्ट आहे. मला आवडेल या लढाईमध्ये भाग घेणं. कारण ही विचारांची लढाई आहे. ती काही वैयक्तिक लढाई माझी आणि त्यांची नाही."

हेही वाचा -

  1. सहा याचिकांच्या निकाल द्यायचा असल्यानं विधानसभेच्या अध्यक्षांची आज कसोटी-उज्जवल निकम
  2. MLA Disqualification Case : नवा घटनात्मक पेच? नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाला अभिवचनच दिलं नाही; उज्ज्वल निकम यांची माहिती
  3. 16 MLA Disqualification Case : ...कोर्टाच्या निर्देशानंतर 16 आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्वाची - उज्वल निकम
Last Updated : May 2, 2024, 9:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details