महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

बिहारमध्ये आज एनडीए सरकारची फ्लोर टेस्ट, तेजस्वी 'खेळ' करणार की नितीश कुमार पुन्हा 'विश्वास' जिंकणार?

Bihar Floor Test : बिहारच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. एनडीएला आज विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत सट्टा बाजारही तापला आहे. अशा स्थितीत तेजस्वी यादव 'खेळ' करणार की नितीश कुमार पुन्हा एकदा फ्लोर टेस्ट जिंकणार, हा मोठा प्रश्न आहे.

Bihar Floor Test
Bihar Floor Test

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 7:31 AM IST

पाटणा Bihar Floor Test : महाआघाडीपासून फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा बिहारमध्ये भाजपासोबत नवं सरकार स्थापन केलं. आज या सरकारची फ्लोर टेस्ट आहे. एकीकडे आरजेडी आणि विरोधी पक्ष सतत 'मोठा खेळ' होणार असल्याचा दावा करत आहेत, तर सत्ताधारी पक्षाचं म्हणणे आहे की त्यांना 128 आमदारांचा पाठिंबा आहे. याबाबत रात्रभर गदारोळ सुरू होता. रात्री उशिरा पोलीस तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण होतं.

जेडीयूच्या आमदारांमध्ये फूट पडल्याचा दावा :सद्यस्थितीनुसार, एनडीएकडे एकूण 128 आमदार आहेत. यापैकी 78 भाजपाचे, 45 जेडीयू, 4 एचएएम आणि एक अपक्ष आमदार आहे. दुसरीकडे, महाआघाडीकडे केवळ 114 आमदार आहेत. यामध्ये आरजेडीचे 79, काँग्रेसचे 19 आणि डाव्या पक्षांचे 16 आमदार आहेत. आरजेडी जेडीयूच्या आमदारांमध्ये फूट पडल्याचा दावा करत आहे, तर जेडीयूला मात्र त्यांच्याकडे बहुमत असल्याचा विश्वास आहे.

कोण किती पाण्यात :नितीश कुमार यांच्या शपथविधीनंतर आरजेडीचा खेळ सुरू झाला. सभापती अवध बिहारी चौधरी यांनी आपलं पद न सोडण्याच्या आणि अविश्वास ठरावाला सामोरं जाण्याच्या भूमिकेनं पुन्हा एकदा सत्ताबदलाचे संकेत दिले. त्यानंतर आरजेडीनं आपली सूत्र हलवली आणि काँग्रेस आमदारांना हैदराबादला पाठवण्यात आलं. जेडीयूमध्ये मोठी फूट असल्याचा आरजेडीचा दावा आहे. आता कोण किती पाण्यात आहे, हे फ्लोर टेस्टच उघड करेल.

जेडीयूच्या बैठकीतून चार आमदार गायब : इकडे हैदराबादमध्ये गेलेले काँग्रेसचे सर्व आमदार परतल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या घरी तळ ठोकून होते. रविवारी जेडीयूच्या बैठकीतून चार आमदार गायब होते. असं असतानाही जेडीयूचे सर्व आमदार ऐक्याबाबत बोलत असून, तेजस्वी यादव आणि आरजेडी नेत्यांचे वक्तव्य फेटाळत आहेत.

हे वाचलंत का :

  1. नितीश कुमारांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, राजभवनात 'जय श्री राम'च्या घोषणा
  2. नितीश कुमार यांच्यासोबत 'या' आठ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास
  3. नितीश कुमारांच्या शपथविधीवर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

ABOUT THE AUTHOR

...view details