महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

EXCLUSIVE : "देवेंद्र फडणवीस यांच्या जनसेवेची 25 वर्ष पूर्ण", पत्नी अमृता आणि लेक दिविजा काय म्हणाल्या? पाहा व्हिडिओ - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी अमृता फडणवीस आणि दिविजानं ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांच्याशी खास संवाद साधला.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व लेक दिविजा फडणवीस (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2024, 7:57 PM IST

Updated : Oct 26, 2024, 10:11 AM IST

नागपूर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व लेक दिविजा उपस्थित होती. देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा 1999 साली निवडून विधानसभेत गेले होते. आमदार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता आणि लेक दिविजानं भावना व्यक्त केल्या आहेत.

लोकांच्या भल्यासाठी सदैव विचार :नागपूर आणि देवेंद्र फडणवीस हे एक समीकरण आहे. त्यांच्यावर प्रेम करणारी जनता केवळ नागपुरमध्येच नाही, तर राज्यभर असल्याच्या भावना फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केल्या. ते लोकांच्या भल्यासाठी सदैव विचार करत असतात. ज्या योजना ते आखतात त्या पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा ते करत असतात. दक्षिण-पश्चिमच्या मतदारसंघातील मतदार हा आमच्या घरातील असल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व लेक दिविजा यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

मला वकील होऊन जनसेवा करायचीय, दिविजा : "माझ्या बाबांवर प्रेम करणारी जनता बघून मला कायमच अभिमान वाटतो. माझे बाबा लोकप्रेमी आहेत. ते लोकांसाठी काहीही करू शकतात, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांची लेक दिविजानं व्यक्त केली. मला देखील जनसेवा करायची आहे, पण मी वकील होऊन ती जनसेवा करणार, असल्याचं तिनं यावेळी बोलताना सांगितलं.

हेही वाचा

  1. वरळीत आदित्य ठाकरेंसमोर मिलिंद देवरा, संदीप देशपांडेंचं आव्हान; पक्षीय बलाबल कसं?
  2. ठाकरे गटाला प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा पक्षातील 'निष्ठावंतां'चं मोठं आव्हान; अनेक निष्ठावंत बंडाच्या तयारीत
  3. 15 दिवसांची कैद स्थगित; मेधा सोमैया मानहानी प्रकरणात संजय राऊतांना जामीन मंजूर
Last Updated : Oct 26, 2024, 10:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details