छत्रपती संभाजीनगर Amit Shah On MVA Leaders : भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंगळवारी (5 मार्च) छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा पार पडली. यावेळी अमित शाह यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार फटकेबाजी केली. तसंच त्यांनी यावेळी शरद पवार यांना चॅलेंजही दिलंय.
काय म्हणाले अमित शाह? : यावेळी कॉंग्रेसवर निशाणा साधत अमित शाह म्हणाले की, "पुढील पाच वर्ष कोणाला सत्ता मिळणार याचं उत्तर लवकरच कळेल. एकीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व तर दुसरीकडं राहुल बाबा यांची आघाडी. सोनिया गांधी यांचं राहुल गांधींना पंतप्रधान करायचं स्वप्न आहे. त्यामुळं केवळं आपल्या कुटुंबाचं भलं करण्यात व्यस्त असलेले लोकांना न्याय देऊ शकतील का? हा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित होतो." "तसंच सरदार वल्लभभाई पटेल यांनी निझाम तावडीतून मुक्त केलं. मात्र, पुन्हा मजलिस येऊन बसले हे योग्य आहे का?" असा सवालही त्यांनी केलाय.
शरद पवारांना दिलं ओपन चॅलेंज : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत अमित शाह म्हणाले की, "पुढील अनेक वर्षांचा विकास आराखडा आम्ही तयार करुन ठेवलाय. मागे तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं? शरद पवारांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी यावं, आमचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांना हिशोब देतील. सर्वांना सुरक्षित ठेवण्याचं काम मोदींनी केलंय."
उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचं वारस समजायचं का? :"बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांमुळं त्यांना सगळे मानतात. मात्र, छत्रपती संभाजीनगरला आणि कलम 370 ला विरोध करणाऱ्यांसोबत गेलेल्या उद्धव ठाकरे यांना त्यांचं वारस समजायचं का? ते केवळ कुटुंब वादात अडकले आहेत", असं म्हणत शाह यांनी ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर ताशेरे ओढले. पुढं ते म्हणाले की, "पंतप्रधान मोदी कोणत्याही देशात गेले तरी ते हिंदीत बोलून देशाचा सन्मान वाढवण्याचं काम करतात. महाराष्ट्रात आमच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्यांनी कलम 370 , नवीन संसद भवन, राम मंदिरासह अनेक गोष्टींचा विरोध केला. भारताला पुढं घेऊन जायचं असेल तर मोदींनी निवडूण देणं आवश्यक आहे."
हेही वाचा -
- घराणेशाहीवरुन अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, "इंडिया आघाडीतील...."
- अमित शाह महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सोडवणार?
- लोकसभेच्या तोंडावर अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा, दिवसभरात काय असणार कार्यक्रम?