महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

भाजपाकडं प्रचारासाठी 'हे' दोनच शब्द, आदित्य ठाकरेंची टीका

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचारसभेला जोरदार सुरुवात झालीय. तर राज्यात विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांकडून घोषणांचा वर्षाव केला जातोय.

Aditya Thakare
आदित्य ठाकरे (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

Updated : 5 hours ago

छत्रपती संभाजीनगर: भाजपा राज्यभर पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीत खोटा नेरेटिव्ह पसरवला गेला असं स्पष्टीकरण देत आहेत. मात्र त्यावर भाजपाकडं एकच मुद्दा आहे तो म्हणजे खोटा नेरेटिव्ह हे दोनच शब्द बोलण्यासारखे राहिलेत अशी टीका, आदित्य ठाकरे यांनी केली. तर खोट्या जाहिराती करणाऱ्या भाजपावर निवडणूक आयोग कारवाई करणार का? याबाबत शंका आहे. आता आमचा कोणत्या संस्थांवर नाही मात्र लोकांवर विश्वास असल्याचं आदित्य यांनी सांगितलं.



मराठवाड्याला काही दिलं नाही : महाराष्ट्रात महाविकास आघाडीची लाट आहे. मविआची पंचसूत्री जाहीर झाली आहे. आमचा वचननामा देखील जाहीर झाला. महाराष्ट्राची लूट या सरकारनं केलीय, मराठवाड्यात याच ठिकाणी बैठक झाली होती, त्यामध्ये फक्त घोषणा झाल्या, विभागाकडं काय आलं याचं उत्तर यांनी अजून दिलं नाही. कारण मुळात काही आलच नाही, भाजपाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे फसवणूक करत आहेत. आजपासून मराठवाड्यात आम्ही प्रचाराला सुरुवात करत आहोत.

प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे (ETV Bharat Reporter)



आयोगावर विश्वास नाही : भाजपा खोटे बोलणारा मोठा जुमलेबाज पक्ष आहे. खोट्या जाहिरातीबाबत काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाकडं तक्रार जरी केली तरी निवडणूक आयोग कितपत कारवाई करेल हे माहिती नाही. आयोग आणि इतर संस्थांवर कितपत विश्वास ठेवावा त्यांनी काही पावलं उचलली तर विश्वास ठेवता येईल, आमचा जनतेवर विश्वास आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत डाव्या विचार सरणीच्या 180 संघटना होत्या, असा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करत असतील तर, इतर ठिकाणी गुंड, पाकीटमार फिरतात त्यांच्यावर का बोलत नाहीत. मंत्रालयात रील तयार केली, एका एपीआयवर हल्ला झाला त्यावर बोलले नाहीत. महिलांवर अत्याचार वाढत चालले आहेत, महिला सुरक्षित नाहीत. त्यावेळी फडणवीस कुठे होते. गृहमंत्री म्हणून त्यांचं काही कर्तव्य होतं की नाही. अर्बन नक्षल म्हणजे जे भाजपा विरोधात बोलतात त्यांना हा शब्द वापरतात अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.


भाजपा निष्ठावंतांना डावलत आहे :पूनम महाजन यांनी प्रवीण महाजन यांच्या हत्तेत कट होता असा आरोप केला, त्यावर त्या काय बोलल्या मी ऐकलं नाही, मी तुमच्याकडूनच ऐकतो आहे असं आदित्य यांनी सांगितलं. मात्र त्यांना तिकीट का नाकारलं हा सर्वांच्या मनात प्रश्न आहे. गोपाल शेट्टी यांना तिकीट नाही दिलं, भाजपाचे नेते ज्यांनी मेहनत केली असे अनेक कार्यकर्ते दूर फेकले गेले आहेत. प्रकाश मेहता, विनोद तावडे, राज पुरोहित, पंकजा मुंडे आणि पूनम महाजन असे अनेकजण दूर फेकले गेले अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा -

  1. "भाजपा-शिंदेंचा महाराष्ट्रावर दुष्ट डोळा, यांच्यामुळं...."; आदित्य ठाकरेंचा घणाघात
  2. अखेर ठरलं! वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा लढत; उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काय म्हणाले?
  3. आदित्य-अमित ठाकरे बंधू नातं जपणार आणि आमदारकीही मिळवणार, वरळीतून मनसे तर माहिममधून उबाठा घेणार माघार?
Last Updated : 5 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details