महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

नेपाळमध्ये 'प्रचंड' सरकार पडलं, विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर पुष्प कमल दहल यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा - Nepal Prime Minister resigns - NEPAL PRIME MINISTER RESIGNS

Nepal Prime Minister resign : नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांना मोठा झटका बसला आहे. 'प्रचंड' यांनी संसदेतील विश्वासदर्शक ठराव गमावला आहे. 19 महिने सत्तेत राहिल्यानंतर त्यांना आता पायउतार व्हावं लागतयं.

Pushpa Kamal Dahal Prachanda
पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड (Source : Social Media)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 12, 2024, 9:46 PM IST

काठमांडूNepal Prime Minister resigns: नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी शुक्रवारी संसदेत विश्वासदर्शक ठराव गमावला. आता 19 महिन्यांच्या सत्तेनंतर त्यांना पायउतार व्हावं लागतंय. माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएल युतीनं सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर प्रचंड यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागलं. युतीनं सहमती दर्शवली की कम्युनिस्ट पक्षाचे नेते के.पी. ओली हे नवे पंतप्रधान असतील. नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा यांनी आधीच पुढील पंतप्रधान म्हणून ओली यांना पाठिंबा दिला आहे.

विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात 194 मतं : 25 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर दीड वर्षात प्रचंड यांच्यासाठी हा पाचवा विश्वासदर्शक ठराव होता. चार वेळा विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात ते यशस्वी झाले, मात्र यावेळी त्यांना अपयश आलं. विश्वासदर्शक ठराव मिळविण्यासाठी त्यांना 275 सदस्यांच्या संसदेत किमान 138 मतांची आवश्यकता होती, परंतु त्यांना विश्वासाचा आकडा गाठता आला नाही. देशाच्या 275 सदस्यांच्या संसदेत 69 वर्षीय प्रचंड यांना 63 मतं मिळाली, तर विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात 194 मते पडली. सध्या नेपाळ काँग्रेसकडं 89 खासदार आहेत, तर सीपीएन-यूएमएलकडे 78 खासदार आहेत. त्यांचे एकत्रित संख्याबळ 167 आहे, जे कनिष्ठ सभागृहात बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 138 जागांपेक्षा जास्त आहे.

केपी शर्मा ओली नेपाळचे नवे पंतप्रधान? :गेल्या आठवड्यातच माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएलनं प्रचंड सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. ओली आणि नेपाळी काँग्रेस (NC) नेत्यांनी शुक्रवारी पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांच्या फ्लोअर टेस्टच्या आधी नवीन युती सरकारच्या स्थापनेवर विचारमंथन केलं. नेपाळी काँग्रेस अध्यक्ष शेर बहादूर देउबा यांनी आधीच नेपाळचे पुढील पंतप्रधान म्हणून ओली यांना पाठिंबा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details