न्यूयॉर्क- अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्समध्ये ( New orleans truck attack) नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांच्या गर्दीवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाले आहेत. शमसुद्दिन बहार जब्बार (रा. टेक्सास, 42) असे ठार झालेल्या अमेरिकन नागरिकाचं नाव आहे.
ट्रकमधून आलेल्या दहशतवाद्याच्या हल्ल्यात अमेरिकेत 15 ठार, एलॉन मस्कनं काय व्यक्त केला संशय? - USA TERROR ATTACK
अमेरिकेतील ( New orleans truck attack ) न्यू ऑर्लिन्समध्ये उत्सव साजरा करणाऱ्या लोकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 15 जण ठार झाले आहेत.
Published : Jan 2, 2025, 8:37 AM IST
दहशतवाद्यानं पांढऱ्या रंगाचा ट्रक गर्दीत वळवला. त्यानंतर बाहेर पडून पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दहशतवाद्याचा मृत्यू झाला. मात्र, दोन पोलीस जखमी झाले. शुगर बाऊल ही दरवर्षी महाविद्यालयस्तरावरील फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी हा दहशतवादी हल्ला झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बोर्बन स्ट्रीट ही नवीन वर्षाच्या उत्सवासाठी आणि मार्डी ग्रास परेडसाठी प्रसिद्ध आहे. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडून (एफबीआय) तपास सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. न्यू ऑर्लीन्स पोलिसाच्या माहितीनुसार मोठा नरसंहार घडवून आणण्यासाठी दहशतवादी हल्ला करण्यात आला. एफबीआयच्या वाहनावर एक स्फोटक मशिन आणि बॉम्ब सापडला आहे. काही संशयास्पद उपकरणेदेखील पोलिसांकडून निकामी करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की दहशतवादी जब्बार हा ह्यूस्टनमध्ये राहत होता. त्याच्यावर चोरीसह इतर गुन्हे दाखल आहेत
- न्यू ऑर्लिन्स हल्ल्याबाबत बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले, "दहशतवादी हल्ल्याबाबत एफबीआयकडून तपास सुरू आहे. हल्लेखोर शमशुद्दिन जब्बार हा अमेरिकन नागरिक असून सैन्यात कार्यरत होता. हल्ल्यापूर्वी त्यानं इसिसकडून प्रेरणा मिळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
सायबरट्रकच्या स्फोटात एक जण ठार, ऑर्लीन्सचे कनेक्शन?-ऑर्लिन्स येथील दहशतवाद्याच्या हल्ल्याच्या काही तासांनंतर लास वेगासमधील ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलच्या बाहेर टेस्ला सायबरट्रकचा स्फोट झाला. या स्फोटात एक व्यक्ती ठार झाला असून सात जण जखमी झाले. न्यू ऑर्लिन्स येथील 'दहशतवादी' हल्ला आणि ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलच्या बाहेर टेस्ला सायबरट्रक स्फोट या दोन्ही घटनांशी काही संबंध आहे का, हे तपासले जाणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितलं. दोन्ही घटनांमध्ये वापरलेली वाहने 'ट्युरो' या कार रेंटल साइटवरून भाड्याने घेण्यात आली होती. ही माहिती समोर येताच टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनीदेखील लास वेगास आणि न्यू ऑर्लीन्स हल्ल्यांमध्ये संबंध असल्याचा दावा केला आहे.