जेरुसलेम Iran Israel War : इस्रायल हल्ल्यात हिजबुल्लाहचा सर्वोच्च नेता नेता हसन नसरल्लाह ठार झाल्यानंतर इराणचा मोठा संताप झाला. त्यामुळे इराणनं इस्रायल हमास युद्धात उडी घेत मंगळवारी रात्री इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्र डागली. इराणकडून तब्बल 180 बॅलेस्टिक क्षेपणास्र डागण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यामुळे जगभरात मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. इराणनं क्षेपणास्र हल्ला केल्यानंतर इस्रायलमध्ये आपत्कालीन सायरन वाजवत नागरिकांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात आलं. इराणनं बॅलेस्टिक क्षेपणास्र डागल्यामुळे संतापलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यन्याहू यांनी "इराणनं मोठी चूक केली," असा गर्भीत इशारा यावेळी दिला.
इराणनं डागले 180 बॅलेस्टिक क्षेपणास्र :हिजबुल्लाहचा नेता हसन नसराल्लाह आणि हमास प्रमुख इस्माईल हनिया यांचा खात्मा करण्यात आल्यानं इराण संतापलेला होता. त्यातच इस्रायल सैन्यानं हिजबुल्लाहचा नेता हसन नसराल्लाह याचा खात्मा केल्यानं इराणनं इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात उडी घेतली. हिजबुल्लाहचा नेता हसन नसराल्लाह याच्या मृत्यूचा बदला म्हणून इस्रायलवर हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे. इराणकडून तब्बल 180 बॅलेस्टिक क्षेपणास्र डागण्यात आल्याची माहिती इस्रायलच्या आयडीएफचे प्रवक्ते डॅनिस हगारी यांनी वृत्तसंस्थेला दिली.
तेल अवीवपर्यंत पोहोचली क्षेपणास्र :इराणनं इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्र डागली. यातील अनेक क्षेपणास्र तेल अवीवपर्यंत पोहोचली. या हल्ल्यानंतर इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. इस्राइल डिफेन्स फोर्सचे प्रवक्ते डॅनियस हगारी यांनी या हल्ल्याबाबत वृत्तसंस्थेला माहिती दिली. ते म्हणाले की, "इराणकडून मोठ्या प्रमाणात इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्र डागण्यात आली आहेत. सध्या इस्रायलची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. यातील अनेक क्षेपणास्र ही तेल अवीवपर्यंत आली आहेत. सध्या नागरिकांना बंकरमध्ये आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."
ही इराणची मोठी चूक, बेंजामिन नेत्यन्याहू यांचा गर्भीत इशारा :इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणनं केलेल्या बॅलेस्टिक हल्ल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यावेळी, "इराणनं मंगळवारी रात्री मोठी चूक केली. त्यांना जोरदार प्रत्युत्तर मिळेल," असं स्पष्ट केलं. त्यामुळे इराणनं केलेल्या या बॅलेस्टिक हल्ल्यामुळे आता इस्रायल कसं प्रत्युत्तर देणार याकडं जगभराचं लक्ष्य लागलं आहे. दरम्यान इराणनं केलेल्या या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इतर देशांनीही संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा :
- इस्रायलच्या हवाई हल्ल्यात लेबेनॉनमध्ये १००हून अधिक जणांचा मृत्यू, आणखी एक कमांडर ठार - Israel attacks lebanon houthi
- हिजबुल्लाहच्या प्रमुखाला ठार केल्यानंतर इस्रायलचा इराणला इशारा; "आम्हाला लक्ष्य करतात त्यांना..." - israel hezbollah war
- इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा कमांडर ठार, अमेरिकेच्या शस्त्रसंधीच्या आवाहनाला नकारघंटा - Israel attack on Hezbollah