जेरुसलेम :इस्रायलच्या सैन्यानं हमासचा म्होरक्या याह्या सिनवर याचा खात्मा केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. इस्रायलवर 7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हा याह्या सिनवर असल्याचा दावा इस्रायलच्या सैन्यानं केला. याह्या सिनवर याचा खात्मा करण्यात आल्याच्या वृत्ता इस्रायली सैन्याचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी दुजोरा दिला आहे. हमासचा म्होरक्या मारला गेला असला, तरी आमचं काम अद्यापही पूर्ण झालं नाही. आम्ही आमच्या सगळ्या ओलिसांना घरी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं आयडीएफचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
अजून युद्ध पूर्ण झालं नाही - डॅनियल हगारी :इस्रायली सैन्यानं हमासचा म्होरक्या याह्या सिनवर याचा खात्मा केला. मात्र अद्यापही आमचं काम पूर्ण झालं नसल्याचा दावा आयडीएफ प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी वृत्तसंस्थेला बोलताना सांगितलं. यावेळी बोलताना आयडीएफ प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले की, "7 ऑक्टोबरच्या हत्याकांडाला हमास दहशतवादी संघटनेचा म्होरक्या याह्या सिनवार हा जबाबदार होता. त्यामुळे इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात याह्या सिनवर याचा मृत्यू झाला आहे. आमचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. आम्ही आमच्या सर्व ओलिसांना घरी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. इस्रायलच्या नागरिकांच्या रक्षणासाठी आम्ही मिशन पूर्ण होईपर्यंत काम करू.