मुंबई-पाणी म्हणजे जीवन म्हटले जाते. जीवन जगण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. बदलत्या हवामानामुळे जलसंवर्धनाची गरज वाढली आहे. त्याबाबत जनतेला जागरुकता करण्यासाठी 'जागतिक जल दिन' साजरा करण्यात येतो. त्यासाठी शाळांसह सरकारी कार्यालय आणि स्वयंसेवी संस्थांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
ETV Bharat / health-and-lifestyle
जगभरात आज साजरा केला जातोय 'जागतिक जल दिन', काय आहे या 'जीवनाचं' महत्त्व? - world water day 2024 - WORLD WATER DAY 2024
World Water Day 2024 जगभरातील अनेक देशांमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असताना पाण्याचा प्रचंड अपव्ययदेखील होतो. २२ मार्च हा दिवस जगभरात जागतिक जलदिन म्हणून साजर करण्यात येतो. या दिनाचं महत्त्व जाणून घेऊ.
Published : Mar 22, 2024, 8:53 AM IST
|Updated : Mar 22, 2024, 9:12 AM IST
जागतिक जल दिनाचा काय आहे इतिहास?ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेनं 'जागतिक जल दिन' साजरा करण्याचा 1992 मध्ये निर्णय घेतला. त्यानंतर दरवर्षी २२ मार्चला 'जागतिक जल दिन' साजरा करण्यास सुरुवात झाली. शेतीसह विविध उद्योग आणि उर्जानिर्मितीसाठी पाण्याची गरज असते. मात्र, देशाच्या विविध भागांमध्ये पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीनं वापर करून जलसंवर्धन करणं ही काळाची गरज ठरत आहे. समृद्धीसाठी आणि शांततेसाठी पाणी ही संकल्पना घेऊन यंदा जागतिक जलदिन साजरा करण्यात येतो.
आरोग्यासाठी पाण्याचं काय आहे महत्त्व?
- आपल्या शरीरात सुमारे ७० टक्के पाणी असते. त्याचाच अर्थ पाण्याची शरीराला विविध प्रक्रिया करण्यासाठी गरज असते. विशेषत: उन्हाळ्यात वाढते तापमानामुळे शरीराचं तापमान नियंत्रित करण्याकरिता योग्य प्रमाणात पाणी पुरेसं असणं गरजेचं असते. मात्र, अनेकदा तहान लागल्यावर कोल्ड ड्रिंक पिल्यानं तोटे जास्त असतात, असा आहारतज्ज्ञांचा दावा आहे.
- दिवसभरात किमान ३ लिटर पाणी पिणं आवश्यक असते. त्यापेक्षा कमी प्रमाणात पाणी पित असाल तर काळजी घेणं गरजेचं असते.
- पुरेशा प्रमाणात पाणी पिले नाही तर मेंदूसह संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उर्जा पातळी कमी न होण्याकरिता पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याची गरज असते.
- पुरेशा प्रमाणात पाणी पिले तर एकाग्रता कायम राहते. जर शरीरात पुरेसे पाणी नसेल तर चिडचिड होते.
- वजन कमी करण्यासाठीदेखील पाणी फायदेशीर ठरू शकते. पाण्यामुळे पचनशक्ती प्रक्रिया चांगली राहते. तसेच भूकेवर नियंत्रण राहते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त आहार घेण्याची सवय टाळता येते.
- कोलॅजिन या घटकामुळे त्वचेचे आरोग चांगले राहते. मात्र, शरीरात पुरेसं पाणी नसल्यास त्वचा ही कोरडी आणि सुरकती असलेली होती. जर तुम्हाला निरोगी त्वचा हवी असेल तर पुरेशा प्रमाणात पाणी प्या. सर्व इंद्रियांच कार्य सुरळित चालण्याकरिता शरीरात पुरेसे पाणी असायला हवं.