महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

हसण्याचे आरोग्याला मिळतात आश्चर्यकारक फायदे, जगभरात आज होतोय 'हास्य दिन' साजरा - World Laughter Day 2024 - WORLD LAUGHTER DAY 2024

World Laughter Day 2024 : जागतिक हास्य दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. जाणून घ्या या दिवसाची सुरुवात कशी झाली? हसण्याचे फायदे काय आहेत?

world laughter day 2024
जागतिक हास्य दिन (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 9:59 AM IST

हैदराबाद World Laughter Day 2024 : सध्याच्या काळात लोक ताण-तणावाला सामोरे जातात. हसण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नसली तरी जीवनशैली आणि काम यात समतोल राखताना आपण हसणं विसरून जातो. अशा परिस्थितीत आपल्या दैनंदिन जीवनात हास्य आणि हास्याचं महत्त्व सांगण्यासाठी 'जागतिक हास्य दिन' साजरा केला जातो.

जागतिक हास्य दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यंदा हा दिवस 5 मे रोजी साजरा केला जातोय. या दिवशी देश-विदेशात विविध प्रकारच्या विनोदी स्पर्धांचं आयोजन केलं जातं. 'जागतिक हास्य दिन' ची थीम लोकांना हसत आणि आनंदी ठेवण्यावर भर देते. प्रत्येक गोष्ट हसतमुखानं केल्यानं आयुष्य तर चांगलं होतंच. पण अनेक आजारही आपोआप नाहीसे होतात. मानसशास्त्रीय प्रयोगातून असं दिसून आलंय की, जी मुलं जास्त हसतात ती अधिक हुशार असतात. प्रत्येकाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी हसणं फार महत्त्वाचं आहे.

जागतिक हास्य दिनाचा इतिहास : जागतिक हास्य दिनाची सुरुवात भारतात झाली. 10 मे 1998 रोजी मुंबईत पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. जागतिक हास्य दिनाची सुरुवात हास्य योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी केली. तेव्हापासून दरवर्षी मे महिन्याचा पहिला रविवार हा जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश हसण्याद्वारे लोकांमध्ये परस्पर प्रेम आणि सौहार्द वाढविणं हा आहे.

हास्य दिनाचा उद्देश :जगात शांतता प्रस्थापित व्हावी आणि मानवजातीमध्ये बंधुभाव आणि सौहार्द प्रस्थापित व्हावं या उद्देशानं जागतिक विनोद दिनाची सुरुवात करण्यात आलीय. 'हास्य योग चळवळी'च्या माध्यमातून या दिवसाची लोकप्रियता जगभर पसरली. आज जगभरात 6,000 हून अधिक कॉमेडी क्लब आहेत. यानिमित्तानं देश-विदेशातील प्रमुख शहरांमध्ये रॅली, विनोदी स्पर्धा, संमेलनं आयोजित केली जातात. हास्य माणसाच्या विद्युत-चुंबकीय क्षेत्रावर परिणाम करते. व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते. जेव्हा एखादी व्यक्ती समुहात हसते तेव्हा ही सकारात्मक ऊर्जा संपूर्ण परिसरात पसरते.

हसणं व्यक्तिमत्व आणि आरोग्याशी निगडीत आहे का? :हसणं केवळ तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं नाही तर ते काही प्रमाणात तुमचं व्यक्तिमत्त्वही ठरवतं. तुम्ही खूप हसत असाल तर याचा अर्थ तुम्ही आयुष्यात सकारात्मक आहात. हसण्यामुळं तुमच्या शरीरात एंडोर्फिन तयार होतात जे शरीरात नैसर्गिक वेदना कमी करणारे असतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी हसणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुमच्या पोटाचे स्नायू विस्तारतात आणि आकुंचन पावतात. याशिवाय हास्य हे तुमच्या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी कमी करते.

हसण्याचा आरोग्याला मिळणारे फायदे

  • तणाव कमी करते : हसण्यामुळं कॉर्टिसॉल सारखे तणावाचे संप्रेरक कमी होतात.
  • रोग प्रतिकारशक्ती वाढते : हसण्यामुळं अँटीबॉडीजचं उत्पादन वाढतं आणि रोगप्रतिकारक पेशी सक्रिय होतात. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • वेदनांपासून आराम : हसताना एन्डॉर्फिन सोडले जातात हे नैसर्गिकपणे वेदना कमी करण्यास मदत करतात
  • मनःस्थिती सुधारते : हसण्यामुळं मेंदूतील एंडोर्फिन, रसायनं बाहेर पडतात ज्यामुळं आनंद आणि उत्साहाची भावना निर्माण होते.
  • उत्पादकता वाढवते: हास्यामुळं कामाच्या ठिकाणी उत्पादकता आणि टीमवर्क वाढू शकते.

हेही वाचा -

  1. जागतिक पासवर्ड दिन 2024 ; जाणून घ्या जागतिक पासवर्ड दिनाचं महत्व आणि इतिहास - world Password day
  2. आंतरराष्ट्रीय कामगार दिन : फक्त मे महिन्यातच का साजरा केला जातो कामगार दिन ? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास - LABOUR DAY 2024
  3. 'इंटरनॅशनल डान्स डे' : शाहिद कपूरसह जॅकी भगनानीनं चाहत्यांना दिल्या 'डान्स डे'च्या शुभेच्छा - international dance day 2024

ABOUT THE AUTHOR

...view details